एक्स्प्लोर
आरक्षणासाठी धनगर समाजाचे 400 घोडेस्वार हिंगोलीहून मुंबईला रवाना
सत्तेत येण्यापूर्वी भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

हिंगोली : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे बांधव घोडेस्वारी करत हिंगोलीवरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. हा आगळावेगळा क्षण पाहण्यासाठी हिंगोलीत एकच गर्दी झाली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या घोडेस्वारांचा औंढा नागनाथ इथे आज पहिला मुक्काम असेल. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. एवढंच नाही तर मी सत्तेत आल्यानंतर आरक्षण मिळवून देईन, असा वचननामाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लिहून दिला होता. मात्र सत्ता आल्यानंतर वचननाम्याकडे साधे वळूनही न पाहिल्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे आता धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. हिंगोलीतील रामलीला मैदानात शिवसेनेच्या अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन, काल (25 जानेवारी) हे बांधव 400 घोड्यांवर स्वार होत मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आणखी वाचा























