एक्स्प्लोर

कम्युनिकेशन गॅपमुळे सोलापुरात 40 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही, आयुक्तांचा खळबळजनक खुलासा

सोलापूर शहरातील मृतांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. यातच पालिका आयुक्तांनी एक धक्कदायक माहिती दिली आहे. कम्युनिकेशन गॅपमुळे शहरातील 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर दिलीय.

सोलापूर : सोलापूर शहरातील मृतांच्या संख्येत रोज वाढ होत असतानाच एक धक्कदायक माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलीय. कम्युनिकेशन गॅपमुळे शहरातील 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती आयुक्तांनी दिलीय. त्यामुळे सोलापूर शहरातील मृतांचा आकडा आता थेट 213 वर पोहोचला आहे. सोमवारी रात्री अचानक तातडीची पत्रकार परिषद घेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा धक्कादायक खुलासा केला. शासनाने 2 जून रोजी एका अॅप्लिकेशनची निर्मिती केली होती. ज्यात रुग्णांची आकडेवारी रुग्णालयांनी भरायची बंधनकारक होती. "या अॅपची ट्रेनिंग देणारा कर्मचारी आजारी पडला तसेच कंट्रोल रुम मधील व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने फॉलोअप घेता आले नाही. तसेच आरोग्य अधिकारी देखील बदलला गेला. त्यामुळे या 40 रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी अपडेट करता आली नाही." अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.  तर मृत्यूची आकडेवारी रुग्णालयांकडून मिळवण्यासाठी एका डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती देखील मनपा आयुक्तांनी दिली आहे.
ज्या 40 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली नव्हती त्यांचे मे आणि जून महिन्यात मृत्यू झाले आहेत. अश्विनी हॉस्पीटल, कुंभारी, अश्विनी सहकारी रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल), सीएनएस हॉस्पिटल, मार्कंडेय सहकारी रुग्णालय, सिद्धार्थ हॉस्पिटल, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांनी ही माहिती पालिकेपर्यंत पोहोचवलेली नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासन या रुग्णालयांबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सर्व प्रकारामुळे सोलापुरातील कोरोना संदर्भातील आकडेवारी देखील उशिरा जाहीर करण्यात आली. शहरात सोमवारी 27 रुग्णांचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 17 कोरोनाबाधितांनी डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत 1957 जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर सोमवारी मृत्यूचे 3 आणि आयुक्तांनी जाहिर केलेले 40 रुग्णांचे मृ्त्यू समाविष्ट केल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 213 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात 1059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अद्याप 658 रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागातील देखील सोमवारी 8 रुग्णांची भर पडली. त्यात करमाळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील झेर येथे ठाणेहून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागीत कोरोनाबाधितांची संख्या 204 वर पोहोचली आहे. त्यापैकी 11 जणांचा आतापर्यंत मृ्त्यू झाला आहे. दिवसभरात ग्रामीण भागातील 11 रुग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला असल्याने आतापर्यंत 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ग्रामीण भागातील 106 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. सोमवारी आढळलेल्या रुग्णांमुळे शहरात 39 आणि अक्कलकोट तालुक्यात 7 तर करमाळ्यात 1 अशी तालुकानिहाय वाढ झाली आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget