एक्स्प्लोर
पिठाच्या डब्यात 4 बंदुका, नागपुरात महिलेकडून शस्त्रसाठा जप्त
नागपूर : नागपुरात एका महिलेच्या स्वयंपाकघरातून पोलिसांनी 4 नव्या बंदुका आणि 26 जिवंत काडतुसं जप्त केले. मंगला साळुंखे असे या महिलेचे नाव असून, भांडे प्लॉटमधील सेवादल नगरात तिच्या घरुन हे हत्यार सापडले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काल संध्याकाळी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगला साळुंखेच्या घरी छापा टाकला. तेव्हा स्वयंपाक घरात एका पिठाच्या डब्यात हा सर्व शस्त्र साठा सापडला.
पोलिसांनी मंगला साळुंखेला अटक केली असून, तिची सखोल चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, मंगला साळुंखेच्या घरी पोलिसांना काही पत्र सापडली असून, त्यात नागपुरातील काही सराईत गुन्हेगारांचा उल्लेख आहे. शिवाय, हे पत्र दिनेश गायकी नावाच्या एका कुख्यात गुन्हेगाराने थेट नागपूरच्या सेंट्रल जेलमधून लिहिल्याची माहिती आहे.
जेलमधून काही कुख्यात गुन्हेगार शस्त्र साठा जुळवत होते का? मंगला साळुंखे त्यांना साथ देत होती का? आणि हे शस्त्र नेमक्या कोणत्या गुन्ह्यासाठी नागपुरात लपविण्यात आले होते? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आता पोलिसांना शोधावे लागणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement