एक्स्प्लोर
शिर्डीत ड्रेनेजमध्ये पडून 4 शेतकऱ्यांचा गुदमरुन मृत्यू

अहमदनगर : ड्रेनेजमध्ये गुदमरल्यानं चार शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना शिर्डीत घडली आहे. नगरपंचायतीच्या ड्रेनेजलाईनमधून काही शेतकरी शेतीसाठी पाण्याचा उपसा करत होते. यावेळी ही दुर्घटना घडली. ड्रेनेजच्या चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी सुरुवातीला एक शेतकरी आत उतरला. बराच वेळ तो बाहेर आला नसल्यानं दुसरा शेतकरी आत गेला. त्यानंतर बराच वेळ हे दोघेही बाहेर न आल्यानं त्यांना पाहण्यासाठी आणखी दोघे चेंबरमध्ये उतरले. मात्र, दुर्दैवानं या चारही जणांचा मृतदेहच बाहेर काढण्यात आले. सखाराम शिंदे, नवनाथ शेळके, आनंद मोरे आणि मारुती मिंधार अशी या शेतकऱ्यांची नाव आहेत. चेंबरमधल्या विषारी वायूमुळं गुदमरुन या चौघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र, नेमकं कारण शवविच्छेदनानंतरच कळेल असं पोलिसांनी सांगितलं.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















