(Source: ECI/ABP News/ABP Majha)
30th June Headlines: पुढच्या 48 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण; आज दिवसभरात
30th June Headlines: सांताक्रुझ येथील पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुंबई: मुंबई आणि उपनगरात पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,
देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरमध्ये
मोदी@9 या कार्यक्रमासाठी आज देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. गंगापूरला दुपारी 12 वाजता जल जीवन मिशन अंतर्गत जायकवाडीतून गंगापूर तालुक्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
बीडमध्ये विनायक मेटेंच्या पहिल्या जयंतीचा कार्यक्रम
शिवसंग्रामची दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पहिली जयंतीचा कार्यक्रम आज होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित असणार आहेत.
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन
राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, नेते उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देखील या वेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अनिल परब यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
अनिल परब यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सांताक्रुझ येथील पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी परबांसह सहा जणांची अटक टाळण्यासाठी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचा शेवटचा दिवस
पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
पुढच्या 48 तासात मुंबई- उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता
पुढच्या 48 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, पालघर आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि ठाण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजच्या कोर्टातल्या सुनावणी
- कोरोनाकाळात बेस्ट विरोधातील आंदोलन प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल शहा यांच्यासह 20 जण याप्रकरणी आरोपी आहेत. कोरोनाकाळात वाढीव वीज बिलं आकारण्यात आल्याचा आरोप करीत मविआ सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपींवर आरोप निश्चिती झाली असून नियमित सुनावणीला सुरूवात होईल.
- महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित आणि हाय प्रोफाइल खून खटला असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन खासदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यात प्रमुख आरोपी आहेत. त्यांचे चुलत भाऊ आणि स्थानिक काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत हायवेवर गोळ्या झाडून हत्या झाली होती.
- कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांसह अन्य आरोपींनी ED नं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. यावर ED चे वकील युक्तिवाद करणार आहेत.
- समीर वानखेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणांत आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडिधिका-यालाही एनसीबीच्या अधिका-यांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यावर आज सीबीआय मांडणार आपली भूमिका.