एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील विकासकामांच्या बजेटला ३० टक्क्यांची कात्री : चंद्रकांत पाटील
'सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळं अनेक प्रश्न सोडवताना त्याचा बोजा सरकारवर पडतो आहे.'
कोल्हापूर : सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळं राज्यातील सर्वच विकासकामांच्या बजेटला ३० टक्क्यांची कात्री लागल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं आज सर्वच खात्यानं लागू केलं असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
राज्यातील मुख्याध्यापक संघाचं राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून तीन दिवस कोल्हापुरात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
मुख्याध्यापकाचे प्रश्न फार गंभीर असून हे सोडवण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळं अनेक प्रश्न सोडवताना त्याचा बोजा सरकारवर पडतो आहे.
राज्यातील सर्वच विकासकामांच्या बजेटला ३० टक्क्यांची कात्री लागल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं आज सर्वच खात्यानं लागू केलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मेक इन महाराष्ट्रचा बट्ट्याबोळ, रोजगार घटले!
राज्याची आर्थिक स्थिती बिकट, कर्जाची सर्वोच्च मर्यादा गाठली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement