एक्स्प्लोर
BJP Office Mumbai : भाजप कार्यालय भूमीपूजनावरून वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते मुंबईतील (Mumbai) भाजपच्या (BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले, परंतु या सोहळ्यावरून महाविकास आघाडीने (MVA) गंभीर आरोप केले आहेत. 'भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही, आमच्यावर पत्थर फेकण्याचा प्रयास मत करो,' असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शहांना पत्र लिहून जागेच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आणि 'राफेलच्या वेगाने' (Rafale Speed) परवानग्या दिल्याचा आरोप केला आहे. चर्चगेट (Churchgate) परिसरातील ही जागा मिळवताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, आम्ही कोणतीही सरकारी जागा घेतली नसून, सर्व नियमांचे पालन करूनच खासगी जागा विकत घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता केवळ आरोप होणार की या प्रकरणाची चौकशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
Advertisement


















