एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगरमधील जेलची भिंत फोडण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील नेवासा कारागृहाची भिंत फोडण्याचा प्रयत्न सराईत गुन्हेगारांनी केला आहे. पण वेळीच हा प्रकार जेलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळल्यानं त्यांचा प्रयत्न फसला आहे. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"नगरमधील हे जेल फार जुनं आहे. त्यामुळे आरोपींना जेलची भिंत फोडण्याची शक्कल सुचली. जेलमधील दरवाजाच्या पट्ट्या व भिंती बऱ्याच कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन जेल उभारलं पाहिजे तसंच जेलमधील पडझड मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं त्याची लगेच दुरुस्ती करणंही गरजेचं आहे," असं पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलं. तसंच त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
जेलमधील भिंतीचा काही भाग फोडण्यात आला आहे. त्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीनं पाहणी करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संदीप लवांडे, अमर पवार आणि मयूर आव्हाड या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement