एक्स्प्लोर

India Test Squad vs South Africa 2025: पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती

India Test Squad vs South Africa 2025: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे.

India Test Squad vs South Africa 2025: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा (Ind vs SA) संघ जाहीर केला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा (India Test Squad vs South Africa 2025) यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा संघात परतला आहे. 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताची ही तिसरी कसोटी मालिका असणार आहे. 

ऋषभ पंतला (Rishabh Pant) इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटीत दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर तो आशिया कप, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळू शकला नाही. यामुळे 100 हून अधिक दिवसांनंतर ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. तसेच आकाश दीपचेही संघात पुनरागमन झाले आहे. ऋषभ पंतच्या समावेशामुळे एन. जगदीसनला संघाबाहेर जावे लागले. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. 

मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष- (Mohammed Shami)

बंगालकडून तीन रणजी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करूनही अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची भारतीय संघात निवड झाली नाही. शमीने आपल्या शानदार 3 कौशल्याच्या जोरावर बंगालला उत्तराखंड आणि गुजरातविरुद्ध सलग विजय मिळवून दिला. शमीने या तीन सामन्यांत एकूण 93 षटके टाकताना 15 हून अधिक विकेट्स पटकावल्या होत्या. मात्र या कामगिरीनंतरही दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शमीची निवड झालेली नाही. त्यामुळे शमीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात कोणा कोणाला संधी देण्यात आली आहे, जाणून घ्या...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)

दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)

पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)

दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)

तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)

पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)

दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)

तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)

चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)

पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

संबंधित बातमी:

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
IND vs SA 2nd ODI LIVE Score : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
IND vs SA LIVE : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
IND vs SA 2nd ODI LIVE Score : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
IND vs SA LIVE : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Jay Pawar Rutuja Patil wedding: जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
पलाश मुच्छलला कथित लफड्यांमुळे आलिया भोगासी असावे सादर? आता नेमका गेला कुठं? त्याला वाटतं 18 नंबर जर्सीचे संकट तिथं सुटेल!
पलाश मुच्छलला कथित लफड्यांमुळे आलिया भोगासी असावे सादर? आता नेमका गेला कुठं? त्याला वाटतं 18 नंबर जर्सीचे संकट तिथं सुटेल!
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Embed widget