एक्स्प्लोर

28 April In History: पहिल्या बाजीरावाचं निधन, इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीला लोकांनी गोळ्या घातल्या; आज इतिहासात

On This Day In History : इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याचा जन्मही आजच्याच दिवसाचा. त्याने 1979 ते 2003 अशी 24 वर्षे इराकवर सत्ता गाजवली. 

28 April In History: जगाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा असून आजच्याच दिवशी इटलीचा हुकूमशाह बेनिटो मुसोलिनीची लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. इटलीचा मुसोलिनी, जर्मनीचा हिटलर आणि स्पेनचा जनरल फ्रॅंको यांनी जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. त्यांचा अंत मात्र वाईट पद्धतीने झाला. आजच्याच दिवशी, म्हणजे 28 एप्रिल 1986 रोजी सोव्हिएत युनियनने चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये अणुगळती झाल्याचं मान्य केलं होतं. ही घटना जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाते. 

1740 : पहिल्या बाजीरावाचे निधन

मराठ्यांचा लढवय्या पेशवा पहिल्या बाजीरावाचे (Bajirao I) निधन 28 एप्रिल 1740 रोजी झाले. थोरला बाजीराव पेशवा हा मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे 1720 पासून तहहयात पेशवा होता. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. पहिल्या बाजीरावाने एकही लढाई हारली नसल्याचं सांगितलं जातंय. मध्य प्रदेशात नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने 28 एप्रिल 1740 रोजी पहाटे थोरले बाजीराव पेशवे वयाच्या फक्त 40व्या वर्षी निधन पावले.

1916 : भारतात होमरूल चळवळीची सुरुवात

काँग्रेसच्या नेत्या अॅनी बेझंट (Annie Besant) यांनी भारतात होमरूल लिगची स्थापना केली. अॅनी बेझंट या मूळच्या आयर्लंडच्या. त्या देशात ब्रिटिशांच्या विरोधात होमरुल चळवळ (Indian Home Rule Movement) सुरू करण्यात आली होती. त्याच धर्तीवर अॅनी बेझंट यांनी भारतात ही चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजे स्वराज्य प्राप्ती करणे होय. आपल्या देशाचा राज्यकारभार करण्याचा अधिकार प्राप्त करून घेणे असा होमरूल चा अर्थ होतो. देशात होमरुल लिगच्या माध्यमातून दोन भागात चळवळ सुरु झाली. एक म्हणजे अॅनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरी म्हणजे लोकमान्य टिळकांच्या (Bal Gangadhar Tilak) नेतृत्वाखाली. मुंबई प्रांतात 28 एप्रिल 1916 रोजी बेळगावच्या बैठकीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना केली, आणि होमरुल चळवळीची सुरुवात झाली. तर त्याच वर्षी अड्यार (मद्रास) येथे डॉ. ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. 

1931: प्रसिद्ध मराठी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचा जन्म.

मधू मंगेश कर्णिक (Madhu Mangesh Karnik) हे प्रसिद्ध मराठी साहित्यिक होते. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य या वाड्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक ,चरित्र आणि आत्मचरित्र हे वाड्म़यप्रकारही हाताळले. मधू मंगेश कर्णिकांची माहिमची खाडी, भाकरी आणि फूल आणि संधिकाल या कादंबऱ्या मराठी कादंबरी परंपरेत महत्त्वाच्या ठरतात. केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यातदेखील आले होते.

1937: इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनचा जन्म 

सद्दाम हुसेनचा (Saddam Hussein) जन्म 28 एप्रिल 1937 रोजी बगदादच्या उत्तरेकडील तिक्रितजवळील अल-ओजा गावात झाला. वयाच्या 31 व्या वर्षी सद्दाम हुसेनने जनरल अहमद अल-बकर याच्यासोबत इराकची सत्ता मिळवली. 1979 मध्ये तो स्वतः इराकचा राष्ट्राध्यक्ष झाला. सद्दाम हुसेन 1979 ते 2003 या दरम्यान इराकचे राष्ट्राध्यक्ष राहिला. अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि सद्दाम हुसेनची सत्ता उलथवून टाकली. अमेरिकेच्या सैन्याने त्याला अटक केली. 1982 मध्ये इराकमधील नरसंहार प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला 30 डिसेंबर 2006 रोजी उत्तर बगदादमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता फाशी देण्यात आली. एक शासक म्हणून सद्दाम हुसेनचं जीवन जितकं भव्य होते, तितकेच त्याच्या जीवनाचा शेवट दुःखद होता.

1945 : मुसोलिनीला गोळ्या घातल्या 

इटलीची हुकूमशाह बेनिटो मुसोलिनीची (Benito Mussolini) लोकांनी 28 एप्रिल 1945 रोजी  गोळ्या घालून हत्या केली. इटलीचा मुसोलिनी, जर्मनीचा हिटलर आणि स्पेनचा जनरल फ्रॅंको यांनी जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. इटलीची सत्ता हाती घेतल्यानंतर मुसोलिनीने विस्तारवादी भूमिकी स्वीकारली. मुसोलिनीने 1935 मध्ये अॅबिसिनियावर हल्ला केला आणि येथून दुसरे महायुद्ध सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिटलर आणि मुसोलिनी यांची युती झाली होती आणि दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा एका बाजूला हिटलर आणि मुसोलिनी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स अशी जगाची विभागणी झाली होती. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या हुकूमशहांचा नंतर पराभव होऊ लागला. 

या पराभवामुळे 25 जुलै 1943 पर्यंत मुसोलिनीला पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. पण सप्टेंबरमध्ये हिटलरने त्याची सुटका केली आणि त्याला उत्तर इटलीतील कठपुतळी राज्याचे प्रमुख म्हणून स्थापित केले गेले. यानंतरही फॅसिस्ट शक्ती हरत राहिली आणि 26 एप्रिल 1945 रोजी मित्र राष्ट्रांच्या सैन्याने इटली ताब्यात घेतली. यावेळी मुसोलिनी स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आलं आणि 28 एप्रिल 1945 रोजी त्याला गोळ्या घालण्यात आल्या आणि त्याचे प्रेत लटकवण्यात आलं. 

1986 : चेर्नोबिल अणुभट्टीत अणुगळती झाल्याचं सोव्हिएत रशियाने कबुल केलं

सोव्हिएत युनियनने  28 एप्रिल 1986 रोजी चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये अणुगळती (Chernobyl Disaster) झाल्याचं मान्य केलं. त्याच्या आधी दोनच दिवस ही अणुगळती झाली होती. चेर्नोबिल आण्विक अपघात हा 26 एप्रिल 1986 रोजी सोव्हिएत रशियाच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या चौथ्या अणुभट्टीत घडला होता. इतिहासातील सर्वात भयंकर अणुअपघातापैकी हा एक अपघात असल्याचं समजलं जातं. या घटनेमुळे त्यावेळी थेट 100 जणांचा मृत्यू झाला, तर नंतर हवेच्या प्रदूषणामुळे अप्रत्यक्षरित्या हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जातंय. 

1992 : ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन 

डॉ. विनायक कृष्ण गोकाक हे प्रसिद्ध कन्नड कवी, नाटककार, साहित्यसमीक्षक आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांचे काव्यलेखन 'विनायक' ह्या नावाने प्रसिद्ध आहे. बेल्जियम येथील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनास भारताचे प्रतिनिधी (1960), 'केंब्रिज कॉन्फरन्स ऑन टीचिंग ऑफ इंग्लिश लिटरेचर'ला भारताचे प्रतिनिधी (1966) इ. बहुमानही त्यांना लाभले.1960 मध्ये त्यांना ' दिवा पृथ्वी ' या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी ( कन्नड ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ते पाचवे लेखक होते. 

2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PSLV-C9 लाँच करून नवा इतिहास रचला.



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget