(Source: ECI/ABP News/ABP Majha)
26 March Headlines :उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा, काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; आज दिवसभरात
26 March Headlines : मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. तर, नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत.
26 March Headlines : राज्यात आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा दिवस असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. तर, भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचं आज सत्याग्रह आंदोलन Congress Satyagrah
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
- दिल्ली : राजघाटावर प्रियांका गांधी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसाचं सत्याग्रह करणार आहे.
- मुंबई: राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात आज मुंबई काँग्रेसचा केंद्र सरकार विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात माजी खासदार मिलींद देवरा, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मधू चव्हाण यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार आहेत.
- नागपूर: नागपूरच्या व्हरायटी चौकात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन होणार आहे. याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होण्याची शक्यता आहे.
नाशिक
- शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात ही सभा पार पडत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गट पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधणी करत आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांचा कार्यक्रम सुरू केला आहे. याआधी त्यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेतली होती.
नांदेड
- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा लोहा तालुक्यात होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे तसेच वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे यशपाल भिंगे, बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड यांचा भारतीय राष्ट्रीय समितीमध्ये चंद्रशेखर राव यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. चंद्रशेखर राव यांचा हा दीड महिन्यातील दुसरा नांदेड दौरा आणि जाहीर सभा होणार आहे.
श्रीहरिकोटा
- इस्त्रो आज एलव्हीएम 3 च्या माध्यमातून ब्रिटनच्या संचार कंपनीचे वनवेबचे 36 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.
पुणे
- चंद्रकांत पाटील यांच्याकडून आयोजित कोथरुडमधील शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार.
सांगली
- शहीद अशोक कामटे फाउंडेशन च्या वतीने शहीद दिनाच्या निमित्ताने शहीद मॅरेथॉनचे आयोजन. देश पातळीवरील आणि आंतराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सांगली जिल्हा दौऱ्यावर
- केनियल असोसिएशनच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे डॉग प्रदर्शन, वेगवेगळ्या जातीची डॉग होणार सहभागी.
> पहिल्या महिला आयपीएलच्या जेतेपदाची लढाई
पहिल्या महिला आयपीएलचा आज अंतिम फेरीतील सामना रंगणार आहे. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामाची म्हणजेच IPL 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती महिला IPL च्या पहिल्या सत्रातही होताना दिसत आहे. आयपीएल (2008) च्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधारासमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान होते. आता महिला प्रीमियर लीगमध्येही तेच होत आहे. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.