एक्स्प्लोर
25 मार्चला सैन्यात भरती, 25 मार्चलाच अखेरचा निरोप; कोल्हापूरच्या 23 वर्षीय जवानावर अंत्यसंस्कार
योगायोगाची गोष्ट म्हणजे सूरज चार वर्षांपूर्वी 25 मार्च रोजी सैन्यात भरती झाले होते आणि आज 25 मार्च रोजीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

कोल्हापूर : देशसेवा बजावत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेला महाराष्ट्रातील अवघ्या 23 वर्षांचे जवान सूरज साताप्पा मस्कर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरज मस्कर हे मूळचे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील गिरगावचे रहिवासी होते. सैनिकांचं गाव अशी गिरगावची ओळख आहे. त्यांना अखेरचा निरोप देताना गावकऱ्यांच्या मनात अभिमाना हुंदका आणि आठवणींचे अश्रू दाटून आले होते. आसपासच्या पंचक्रोशीतील लोक या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.
आसाममधील डिंजाल इथे ड्यूटीवर असताना सूरज मस्कर यांना 23 मार्च रोजी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखलं केलं. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. गेल्या 60 वर्षांपासून सैनिकी परंपरा असलेल्या या गावात आज सकाळी सूरजचं पार्थिव आलं आणि गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
गिरगावला सैनिकी परंपरा आहे. शिवाय सूरजच्या मस्कर कुटुंबानेही देशसेवा बजावली आहे. सूरज यांचा धाकटा भाऊ सैन्यात आहे, तर त्यांचे वडील आणि आजोबाही देशसेवा बजावून परतले आहेत. सूरजचं लग्न होऊन दीड-दोन वर्ष झाले आहेत. त्यांच्या मागे आठ महिन्यांची चिमुकली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गिरगावातील प्रत्येक घरात शांतता आहे. गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. सूरज यांच्या निधनाने घरातीलच माणूस गेल्याची भावना प्रत्येकाची आहे.
योगायोगाची गोष्ट म्हणजे सूरज चार वर्षांपूर्वी 25 मार्च रोजी सैन्यात भरती झाले होते आणि आज 25 मार्च रोजीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. तीन दिवसांपासून सूरजच्या पार्थिवाची वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना आज या वीरपुत्राचं पार्थिव दिसताच, अश्रू रोखणं कठीण झालं. सूरज एक महिन्याची सुट्टी संपवून 10 मार्चला पुन्हा सेवेत रुजू झाले होते. त्यांची पोस्टिंग आसाममधील डिंजाल इथे होती. खरंतर गिरगावने गेल्या 60 वर्षात अनेक सैनिक दिले, पण अशा पद्धतीने गावातील जवानाचा पहिल्यांदाच मृत्यू झाला.कोल्हापूरच्या 23 वर्षीय जवानाला अखेरचा निरोप https://t.co/R79PaXEamO pic.twitter.com/Vr9TINaVI1
— ABP माझा (@abpmajhatv) March 25, 2019

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
