एक्स्प्लोर
22 कोटीची थकबाकी, कोल्हापूरचा पाणीपुरवठा रोखण्याची नोटीस
कोल्हापूर मनपाची 2011 पासून थकबाकी आहे. ही थकबाकी आता 21 कोटी 94 लाख 54 हजारांवर पोहोचली आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. येत्या 5 मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास, ही कारवाई करण्यात येईल, असं जलसंपदा विभागाने म्हटलं आहे. तशी अंतरिम नोटीस कोल्हापूर महापालिकेला देण्यात आली आहे.
कोल्हापूर मनपाची 2011 पासून थकबाकी आहे. ही थकबाकी आता 21 कोटी 94 लाख 54 हजारांवर पोहोचली आहे. इतकी मोठी रक्कम अद्याप न भागवल्याने, जलसंपदा विभागाने महापालिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
वारंवार मागणी करुन आणि नोटीस बजावूनही 2011 पासून थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने आक्रमक पाऊल उचललं आहे.
सध्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement