एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
![नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली 17 Passengers Saved From Bus Stuck In Floodwater At Nandurbar नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/11025837/Nandurbar_ST-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नंदूरबार : नंदूरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. नवापूर तालुक्यात एसटी बस नदीत वाहून जाताना थोडक्यात बचावली. स्थानिकांच्या मदतीने एसटीमधील 17 जणांना वाचवण्यात यश आलं. आज सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली.
एमएच 20 बी एल 2610 ही एसटी बस रंगावली नदीत वाहून जात होती. मात्र यावेळी प्रवाशांनी प्रचंड आरडाओरडा केला. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत जेसीबीच्या साहाय्याने बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.
गुजरातच्या सीमेलगत असलेल्या अहावा डांग जंगल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला आहे. याच पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली होती.
दरम्यान, यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)