16th July Headline : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षाच्या नेत्यांची बैठक, तर अधिवेशनाच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्याची तातडीची बैठक, आज दिवसभरात
16th July Headline : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडणार आहे तर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे.
16th July Headline : विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडणार आहे. विधीमंंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरुवात होणार असून 4 ऑगस्ट रोजी हे अधिवेशन संपणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्याची तातडीची बैठक पार पडणार असून सुनील तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. मनसे कडून राबवण्यात आलेल्या एक सही संतापाची या मोहिमेच्या फलकाचे मानवी साखळीच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर राज्यात मान्सूनचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
विरोधी पक्षनेत्यांची बैठक
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधीमंडळातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडणार आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै 2023 रोजी सुरू होणार आहे. हे अधिवेशन 4 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवस आहेत.
राष्ट्रवादीची तातडीची बैठक
अधिवेशनाच्या पुर्वी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्याची तातडीची बैठक पार पडणार आहे. सुनील तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार असून राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे. प्रतोद अनिल पाटील बैठकीला सगळ्या आमदारांना हजर राहण्याची नोटीस काढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे तर हार्बर लाईनवर सीएसएमटी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते बोरीवली स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मनसेकडून एक सही संतापाची अभियान
मनसे कडून राबवण्यात आलेल्या एक सही संतापाची या मोहिमेच्या फलकाचे मानवी साखळीच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात मान्सूनचा इशारा
पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मुंबईतही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.याचबरोबर संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.