एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 160 कोट्यधीश उमेदवार!
पनवेल: पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवारांपैकी तब्बल १६० उमेदवार हे कोट्यधीश आहेत. पनवेलकर आता यापैकी किती उमेदवारांना संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
परेश ठाकूर – भाजप - संपत्ती 95 कोटी 47 लाख
के. के. म्हात्रे – शेकाप – संपत्ती 37 कोटी 1 लाख
रामदास शेवाळे – भाजप – संपत्ती 29 कोटी 79 लाख
रामजी बेरा – भाजप - 27 कोटी 39 लाख
प्रीतम म्हात्रे – शेकाप - 26 कोटी 71 लाख
ही तर फक्त झलक आहे, पनवेल महापालिकेच्या रिंगणात असे 160 कोट्यधीश उतरले आहेत. सर्वाधिक संपत्ती असलेले भाजपचे उमेदवार परेश ठाकूर हे माजी खासदार राम ठाकूर यांचे चिरंजीव आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे बंधू आहेत.
सिडकोनं पनवेल परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या. त्या बदल्यात त्यांना १२ टक्के विकसित भूखंड देण्यात आले. त्यामुळं इथले उमेदवार कोट्यधीश असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षानं केला आहे.
पनवेल मुंबईचं प्रवेशद्वार आहे आणि तिथं पहिल्यांदाच महापालिकेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी सत्तेसाठी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून कोट्यधीश उमेदवारांना तिकीट मिळालं आहे. आता पनवेलकर यातल्या किती कोट्यधीश उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवतात आणि कितींना घरचा रस्ता दाखवतात हे पाहणं महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement