एक्स्प्लोर
Advertisement
महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला 16 वर्षांनी तुरुंगवास
तक्रारदार महिला 5 सप्टेंबर 2001 रोजी यवतमाळमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरुन मैत्रिणीसोबत चालली होती. त्यावेळी आरोपी नौशादने महिलेला आक्षेपार्ह शब्दात हाक मारत तिचा विनयभंग केला.
मुंबई : आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यांतर तब्बल 16 वर्षांनी आरोपीला तुरुंगात धाडण्यात येत आहे. यवतमाळमधील आरोपीचा जामीन अर्ज रद्द करत मुंबई हायकोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे.
तक्रारदार महिला 5 सप्टेंबर 2001 रोजी यवतमाळमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरुन मैत्रिणीसोबत चालली होती. त्यावेळी आरोपी नौशादने महिलेला आक्षेपार्ह शब्दात हाक मारत तिचा विनयभंग केला. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने तिला दिली. आरोपी नौशाद घटनेच्या वेळी 23 वर्षांचा होता.
28 नोव्हेंबर 2005, म्हणजेच चार वर्षांनी अमरावतीच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी कलम 354 आणि 506 अन्वये दोषी ठरवलं. त्याला सहा महिन्यांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला होता, पण त्याला जामीन मिळाला. 2006 मध्ये नौशादने मुंबई हायकोर्टात याचिका करुन शिक्षेत सौम्यता दाखवण्याची मागणी केली.
तक्रारदार महिलेचा जबाब आणि एफआयआरमध्ये सुसंगती आहे, त्याचप्रमाणे पुराव्यांची उलट तपासणी झाली आहे. त्यामुळे महिलेचा जबाब विश्वासार्ह आहे. विनयभंग हा गंभीर गुन्हा असल्याचं सांगत शिक्षेत सौम्यता दाखवण्याची आरोपीची मागणी कोर्टाने धुडकावून लावली.
'आरोपीला फक्त सहा महिन्यांचा सश्रम कारावास ठोठावून सेशन्स कोर्टाच्या न्यायाधीशांनी खूपच दयाळूपणा दाखवला.' असं हायकोर्टाचे जस्टिस देव म्हणाले. त्यानंतर आरोपी नौशादचा जामीन रद्द करत त्याला पुढील शिक्षेसाठी कोठडीत घेण्यात आलं. शिक्षेत घट केल्यास सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होईल, असंही आदेशात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement