एक्स्प्लोर
महाराष्ट्रातील ‘हे’ 14 पूल धोकादायक स्थितीत!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धोकादायक स्थितीत असलेल्या देशातील शंभरहून अधिक पुलांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : देशातील विविध भागांमधील 100 हून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली होती. या 100 पुलांमध्ये महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश आहे.
यामध्ये सांगली जवळील पेठ, भोसे आणि लांगडेवाडी या पुलांचा समावेश आहे. पुण्याजवळील वर्वे तर उस्मानाबादमधील अलीयाबाद या पुलांचाही यात समावेश आहे. सोलापूरजवळील बोरमणी तर नांदेडमधील पांगरी पूलही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
राज्यातले ‘हे’ 14 पूल धोकादायक स्थितीत :
- पेठ (सांगली)
- भोसे (सांगली)
- लांडगेवाडी (सांगली)
- मिरज गावातील पूल (सांगली)
- वर्वे खुर्द (पुणे)
- मुळा नदीवरील पूल (पुणे)
- आलियाबाद पूल (उस्मानाबाद)
- बोरामणी (सोलापूर)
- काळसेनगरचा पूल (सोलापूर)
- भीमानदीवरचा पूल (सोलापूर)
- पंचगंगा नदीवरील पूल (कोल्हापूर)
- शिवणा नदीवरील पूल (औरंगाबाद)
- असना नदीवरील पूल (नांदेड)
- पांगरी पूल (नांदेड)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement