एक्स्प्लोर

धुळ्यात 135 कोटींचा जमीन घोटाळा : भाजप आमदार

मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र लिहून धुळ्यातल्या जमीन घोटाळ्याबाबत अनिल गोटेंनी माहिती दिली आहे. दलालांना राजकीय संरक्षण असल्याशिवाय जमीन घोटाळा शक्य नाही, असं म्हणत आमदार गोटेंनी सरकारला घरचा आहेर दिला. मागच्या सरकारच्या वाईट गोष्टी आपण का घ्यायच्या? असा सवाल गोटेंनी सरकारला विचारला.

मुंबई : धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी धुळ्याचे पालकमंत्री मंत्री जयकुमार रावळ यांच्यावरील आरोपांबाबत भाजप आमदार अनिल गोटे यांनी सूचक विधान केलं आहे. आग असल्याशिवाय धूर निघत नाही, असं अनिल गोटेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र लिहून धुळ्यातल्या जमीन घोटाळ्याबाबत अनिल गोटेंनी माहिती दिली आहे. दलालांना राजकीय संरक्षण असल्याशिवाय जमीन घोटाळा शक्य नाही, असं  म्हणत आमदार गोटेंनी सरकारला घरचा आहेर दिला. मागच्या सरकारच्या वाईट गोष्टी आपण का घ्यायच्या? असा सवाल गोटेंनी सरकारला विचारला. “शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करताना शासनातील अधिकारी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारुन आपल्या दलालांमार्फत अक्षरश: लूट करत आहेत.”, असा आरोप अनिल गोटेंनी केला. त्याचसोबत, “धुळे शहराजवळ असलेल्या सर्व्हे नंबर 501, 510 या शासकीय मालकीच्या जमिनी आपल्या स्वत:च्या मालकीच्या दाखवून 135 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा नाशिक विभागाचे आयुक्त महेश झगडे यांचा अहवाल पत्रकार परिषदेत सादर केला होता.”, असेही गोटेंनी म्हटले आहे. आता भाजप आमदार अनिल गोटेंनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आता सरकार काय पावलं उचलतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget