एक्स्प्लोर
समर्थ रामदासांनी स्थापन केलेले 11 मारुती
मुंबई : आज देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. महाराष्ट्राला हनुमान भक्तीचा आगळावेगळा वारसा लाभला आहे. समर्थ रामदास स्वामी रामासह हनुमानाचेही निस्सिम भक्त होते. रामदास स्वामींनी राज्यात 11 मारुतींची स्थापना केली. समर्थ रामदास स्वामी आणि रामाचा भक्त हनुमान यांच्यातील एकरुपतेच्या, दोघांमधील दैवी संबंध सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी समर्थपुराणात आढळतात.
महाराष्ट्राला बलोपासनेचं महत्त्व सांगून समर्थांनी मुख्यत्वेकरुन कोल्हापूर, सातारा आणि कराड परिसरामध्ये हनुमान मंदिरांची स्थापना केली. समर्थांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरं स्थापन केली असली, तरी समर्थांकडून स्थापन करण्यात आलेले अकरा मारूती म्हणून जे प्रसिध्द आहेत त्यांची माहिती अनेकांना नाही. समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती जागृत समजले जातात. हनुमान जयंतीला दर्शनासाठी 11 मारुतींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते
समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती
1) शहापूर
सातारा जिल्ह्यातील कराड-मसूर रस्त्यावर असलेल्या शहापूर या गावी समर्थ रामदासांनी पहिल्या मारुतीची स्थापना केली. शहापूरमधील मारुतीची स्थापना समर्थांनी शके 1566 मध्ये केली. हनुमानाची मूर्ती 6 फूट उंचीची आहे. हा मारुती शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.
2) मसूर
सातारा जिल्ह्यातील शहापूरजवळच पुणे-मिरज मार्गावर मसूर गावी समर्थांनी दुसऱ्या मारुतीची स्थापना केली आहे. मसूरच्या हनुमानाची मूर्ती 5 फूटी असून ती पूर्णपणे चुन्यात बनवण्यात आली आहे. या मारुतीची स्थापना शके 1567 मध्ये करण्यात आली आहे.
3)चाफळ
समर्थ रामदासांनी चाफळमध्ये 1569 मध्ये शिष्य आणि गावकऱ्यांच्या मदतीनं राममंदिराची स्थापना केली. या राममंदिरात शके 1570 मध्ये दास मारुती आणि प्रताप मारुतींची स्थापनाही समर्थांनी केली आहे. प्रतापमारुतीला भीममारुती किंवा वीरमारुती म्हणूनही ओळखलं जातं.
4)शिंगणवाडी
साताऱ्यातील चाफळजवळच शिंगणवाडी टेकडीवर समर्थांनी हनुमानाचं स्थापना केली. शके 1571 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली. हा मारुती खडीचा मारुती किंवा बालमारुती म्हणूनही ओळखला जातो. चाफळपासून अगदी जवळ असल्यानं चाफळमधील तिसरा मारुती म्हणूनच या मारुतीची ख्याती आहे.
5) उंब्रज
सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावी समर्थ रामदासांनी मारुतीची स्थापना केली. चाफळहून रोज स्नानासाठी उंब्रजला रामदास स्वामी जात असत. त्यामुळे त्यांनी उंब्रजमध्ये मारुतीची स्थापना केली असावी असा समज आहे. शके 1571 मध्येच उंब्रजच्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिराशेजारीच कृष्णा नदीचा काठ आहे. हा मारुती उंब्रजचा मारुती किंवा मठातील मारुती म्हणूनही ओळखला जातो.
6) माजगाव
माजगावच्या सीमेवर घोड्याच्या आकाराचा एक दगड होता. याला ग्रामस्थ ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजत असत. समर्थ रामदास माजगावला गेले असता ग्रामस्थांनी त्यांना या मारुतीची प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली. त्यानंतर शके 1571 मध्ये समर्थांनी या सातव्या मारुतीची स्थापना केली.
7) बहे-बोरगाव
साताऱ्यातील वाळवे तालुक्यात कृष्णा नदीकाठी बहे-बोरगावमध्ये शके 1573 मध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. कृष्ण महात्म्यात या परिसराचा उल्लेख बाहुक्षेत्र असा आढळतो.
8) मनपाडळे
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा आणि पन्हाळगडजवळील मनपाडळे गावी समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. शके 1573 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली आहे. साडेपाच फूट उंचीची मूर्ती उत्तराभिमुख आहे.
9) पारगाव
कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर पारगावमध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. शके 1574 मध्ये मारुतीची स्थापना करण्यात आली. 11 मारुतींमध्ये उंचीनं सर्वात लहान मूर्ती असून तीची उंची दीड फूट आहे.
10) शिराळे
सांगलीतील सापांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावी समर्थांनी शके 1576 मध्ये मारुतीची स्थापना केली. 7 फूट उंच चुन्याची मूर्ती उत्तराभिमुख आहे. सुर्योदय आणि सुर्यास्ताला मूर्तीच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडतात.
नकाशा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement