10th March Headlines : आज अर्थसंकल्पावर चर्चा, मनीष सिसोदीयाच्या जामिनावर आज निकाल; आज दिवसभरात
10th March Headlines : राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर झालं असून आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. 293 अन्वये विरोधकांचा प्रस्तावावर चर्चा होईल.
10th March Headlines : राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर झालं असून आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. 293 अन्वये विरोधकांचा प्रस्तावावर चर्चा होईल. तसेच गेल्या आठवडाभरापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर देखील चर्चा केली जाईल.
हक्कभंग नोटीस, राहुल गांधी आज विशेषाधिकार समितीपुढे हजर राहणार
दिल्ली – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधींनी अपमानजनक आणि असंसदीय शब्दाचा वापर केला असं म्हणत भाजप खासदारांनी राहुल गांधी विरोधात हक्कभंग नोटीस बजावली आहे. राहुल गांधीना आज विशेषाधिकार समितीपुढे हजर रहायचं आहे, दुपारी 1.30 वाजता.
मनीष सिसोदीयाच्या जामिनावर आज निकाल
दिल्ली – मनीष सिसोदीयाच्या जामिनावर आज दुपारी 2 वाजता निकाल येणार आहे.
शरद पवार नाशिक दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता नाशिक मध्ये दाखल होतील. दुपारी 2 वाजता, नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक संस्थेच्या कार्यालय इमारत नुतनीकरण लोकार्पण सोहळ्याला उपस्थित रहातील. दुपारी 4 वाजता, कळवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
शिर्डी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव
संगमनेर मध्ये मोटार सायकल रॅली निघणार आहे. यात कालीचरण महाराज सहभागी होणार आहे, सकाळी 9 वाजता. श्रीरामपूर शहरात हैदराबादचे भाजप आमदार टि राजा भैय्या सहभागी होणार आहेत, दुपारी 4 वाजता. त्यानंतर होणाऱ्या सभेत श्रीरामपूर येथील लव्हजिहाद प्रकरणा विरोधात सभेत एल्गार केला जाणार आहे. शिर्डी शहरात महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे याला भाजप नेत्या चित्रा वाघ सहभागी होणार आहेत, दुपारी 12 वाजता.
सुषमा अंधारे यांची सभा
परभणी – गंगाखेड येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवगर्जना सोहळ्याचे आयोजन करण्यात आलय, संध्याकाळी 6 वाजता या सभेत सुषमा अंधारे सहभागी होणार आहेत.
नाशिक
- कांदा, द्राक्ष पिकांसह भाजीपाल्याचे पडलेले बाजारभाव आणि दुसरीकडे वाढत असलेली महागाई यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोलपंप चौफुली मुंबई आग्रा महामार्ग चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता.
नंदुरबार
- शिवजयंती निमित्त शोभायात्रा निघणार आहे. शहरात जवळपास 15 ते 20 शोभायात्रा वेगवेगळ्या व्यायाम शाळांच्या वतीने काढण्यात येणार आहे या शोभायात्रांमधील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शिवकालीन तलवारबाजी दांडपट्टा प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.