एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अकोला महापालिकेच्या 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अकोला : अकोला महापालिकेतील तब्बल 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये काँग्रेसचे 6, यूडीएफ 1, सपा 1, भारिप 1 आणि एका अपक्ष नगरसेवकाने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
काँग्रेसचे रफीक सिद्दीकी, दिलीप देशमुख, कोकिला डाबेराव, जया गेडाम, निकत कुरेशी, रिझावना शेख यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
सपामधून नकीर खान, यूडीएफचे रहीमाबी खान, अपक्ष नगरसेवक अजराबी रशीद यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
मुंबईत काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ समजतंय : सुनील तटकरे
आघाडी करण्यासाठी अनुकुलता राष्ट्रवादीने दाखवली होती. मात्र त्याला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. अजूनही काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी आहे, अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेसाठी आघाडी करणार नाही, हे आधीच स्पष्ट केलंय. मुंबईत काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ समजत आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असंही सुनिल तटकरे म्हणाले.
थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुका घेतल्या नसत्या तर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच एक नंबरचा पक्ष राहिला असता, असंही तटकरे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement