Libra Horoscope Today 10th March 2023 : पैसे खर्चही होतील पण नफाही मिळेल; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला
Libra Horoscope Today 10th March 2023 : आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. तसेच, तुमचा जास्त खर्चही होऊ शकतो.
Libra Horoscope Today 10th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल. अधिकाऱ्यांकडूनही प्रशंसा मिळेल. आज मात्र, कोणाच्या सांगण्यावरुन गुंतवणूक करु नका. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल, तरच तुमची कामे मार्गी लागतील.
पैसे खर्चही होतील पण नफाही मिळेल
आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. तसेच, तुमचा जास्त खर्चही होऊ शकतो. पण, आज खर्च केलेला पैसा नंतर तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतो. आजचा दिवस जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळवून देणारा आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा झाल्यामुळे आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मानसिक समतोल राखा
नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. मुलांची आवड-निवड पूर्ण करताना त्यांचं अति लाड करणं टाळा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. मानसिकदृष्ट्या समतोल राखा. प्रकृतीबाबत हलगर्जीपणा करू नका.
आजचे तूळ राशीचे आरोग्य :
आज काही कामामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवा जाणवेल. जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी नियमित तपासणी करावी तसेच वेळेवर औषधं घ्यावीत. तसेच थोडी विश्रांती घ्यावी.
तूळ राशीसाठी आजचे उपाय :
हनुमानाची कोणत्याही रुपात पूजा करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :