Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या उशीरापर्यंत सभा, रेणापूर पोलिसांची कारवाई; 11 आयोजकांवर गुन्हे दाखल
अनेक राजकीय नेत्यांच्या उशिरापर्यंत सभा झाल्या, पण त्यांच्यावर कधीच गुन्हा दाखल केला नाही, पण आमच्यावर केला, असा आरोप मराठा समाजाने केला आहे.
लातूर: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या रेणापूर इथल्या सभेच्या अकरा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याने रेणापूर पोलिसांनी (Renapur Police) ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईमुळे लातूरमधील मराठा समाज आक्रमक झाला आहे. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे उद्या मराठा समाजाची बैठक होणार आहे. हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल केला आहे. याआधी अनेक राजकीय नेत्यांच्या उशिरापर्यंत सभा झाल्या, पण त्यांच्यावर कधीच गुन्हा दाखल केला नाही, पण आमच्यावर केला, असा आरोप मराठा समाजाने केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची 22 डिसेंबरला तारखेला रेणापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेची वेळ संध्याकाळी सात वाजता होती मात्र प्रत्यक्षात सभा रात्री साडे दहा वाजता सुरू झाली होती. उशीरा सभा सुरू झाल्याने रात्री साडे अकराच्या सुमारास संपली होती. या सभेला लातूर जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रेणापूर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेच्या अकरा संयोजकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा समाजाची रेणापूरमध्ये बैठक
रेणापूर पोलिसाच्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे उद्या मराठा समाजाची होणार बैठक होणार आहे. जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभा या अगोदर उशीरा झाल्या आहेत त्यांच्यावर कधीच गुन्हा दाखल केला नाही आणि आमच्यावर केला आहे असा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात उद्या सकल मराठा समाजाची रेणापूरमध्ये बैठक होणार आहे. बैठकीत काय निर्णय होणार आता पाहवे लागणार आहे.
रात्री 11.30 वाजताला सभा संपवली
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्रशासकिय परवानगीनुसार संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान सभा होणे अपेक्षित होती. मात्र, आयोजकांनी परवाना व अटी शर्तीचे उल्लंघन करुन रात्री 11.30 वाजताला सभा संपविली. सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आयोजकांना परवानगीची वेळ लक्षात आणून दिली. तसेच, परवानगीचे व नियम अटींचे उल्लंघन होत असल्याचे देखील सांगितले. मात्र, पोलिसांनी समज देऊनही आयोजकांनी दिलेल्या परवानगीचे, निर्देशांचे उल्लंघन करुन, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन, सभेच्या सभोवतालच्या परीसरात राहत असलेल्या नागरी वसाहतीतील नागरिकांना उपद्रव होईल अशा प्रकारे ध्वनी क्षेपकाचा वापर केला म्हणून, गुन्हा दाखल करण्यात यावे असे फिर्यादीत म्हटले आहे.