एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : भाजप समोरील अजेंडे संपले, जातीय ध्रुवीकरण करुन सत्तेवर येण्यासाठी धडपड, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या समोरील अजेंडे संपल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं.

Prakash Ambedkar : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या समोरील अजेंडे संपले आहेत. त्यामुळं आता समाजात भीती निर्माण करणे आणि जातीय ध्रुवीकरण करत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी धडपड चालू असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. यावर येत्या काही दिवसात एकत्र येऊन विजय मिळवता येईल असेही ते म्हणाले. आंबेडकर हे लातूर (Latur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे अत्याचारग्रस्त तापघाले कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आर्थिक देवाण घेवाणीमधून दलित तापघाले कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. 
 
आता हे जास्त काळ टिकणार नाही

आजमितीला देशात जातीय ध्रुवीकरण तयार करुन भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यातून भाजपला पुन्हा सत्ता प्राप्त करण्याचा मार्ग सुकर वाटत आहे. अतिशय क्रूर प्रकारे हिंसा केली जात असल्याचे आंबेडकर म्हणाले. तसेच लव्ह जिहाद, हिजाब यावरील मते तयार केली जात आहेत. मागील नऊ वर्षापासून हे सुरु आहे. आता हे जास्त काळ टिकणार नाही. आता काही दिवस हा त्रास आहे. निकाल लवकरच लागेल असेही आंबेडकर म्हणाले.

महविकास आघाडीत लवकर निर्णय नाही झाला तर ...

महविकास आघाडीत लवकर निर्णय नाही झाला तर अनेक प्रश्न निर्माण होतील असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आजमितीला महाराष्ट्रामध्ये तेलंगणा प्रवेश करत आहे. बीआरएस पक्षाची सभा आता नागपुरात होत आहे. उद्धव ठाकरे सोडले तर आघाडीतील इतर पक्षाची अवस्था काय? हे सगळ्यांना माहिती असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Majha Maha Katta : कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोण आहे हे कोणालाच माहित नव्हतं, टोपणनावाने ओळखलो जायचो : प्रकाश आंबेडकर

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA: मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
Latur News : 'मी आता जगणार नाही, माझी वाट पाहू नका'; कुटुंबियांना शेवटचा कॉल अन् सुखी संसाराची राख रांगोळी, लातूरच्या तरुणाने लंडनमध्ये संपवलं आयुष्य
'मी आता जगणार नाही, माझी वाट पाहू नका'; कुटुंबियांना शेवटचा कॉल अन् सुखी संसाराची राख रांगोळी, लातूरच्या तरुणाने लंडनमध्ये संपवलं आयुष्य

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Embed widget