एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Latur News : लातूरमधील 14 गावांमध्ये तब्बल 28 हजार वृक्षांची लागवड, हजारो नागरिकांचा सहभाग, मांजरा नदीकाठी यात्रेचे स्वरूप

Latur News Update : लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठावर दहा किलो मीटरपर्यंतच्या क्षेत्रात जवळपास 28 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Latur News Update : लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या 14 गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात जिल्ह्यातील हजारो लोक सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून या वृक्षलागवडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. देखील या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सहभागी झाले होते.  लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केले.  

मांजरा नदीकाठावर दहा किलो मीटरपर्यंतच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.  
 
प्राथमिक शाळा कासारखेडा, चिकलठाणा, बामणी, प्रशाला भातांगळी, श्रीराम विद्यालय कासारखेडा, जय भवानी विद्यालय बामणी, मातृभूमी विद्यालय भातांगळी या शाळेतील सर्व शिक्षक भातांगळी येथे तसेच प्रा. शा. खुलगापूर, मळवटी, कासारगाव, कोळपा, हनमंतवाडी, सकपाळ नगर, भातखेडा, छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी, राजमाता सुशीला देवी विद्यालय महाराणा प्रताप नगर या शाळेतील सर्व शिक्षकांनी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभाग घेतला.  
 
"देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यात लातूरमध्ये 0.6 टक्के वन क्षेत्र आहे. परंतु, वनांचं क्षेत्र सरासरी 33 टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड  करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे, असे मत जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी व्यक्त केले. 

लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
 
सेल्फी पॉईंटचे आकर्षण
आज सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी दहा किलोमीटरची मानवी साखळी करून 28 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार असा सेल्फी पॉईंट ग्रीन वृक्ष टीमने केला होता. सेल्फी पॉईंटमध्ये  जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोटो काढला. नंतर अनेक नागरिकांनी सेल्फी पॉईंटसोबत फोटो काढले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Embed widget