Latur News : इंस्टाग्रामवर हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट, तरुणाला बेदम मारहाण; सात जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Latur News : हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना लातूरमध्ये (Latur) घडली. याप्रकरणी लातूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात लोकांना ताब्यात घेतलं आहे.
Latur News : इंस्टाग्रामवरील (Instagram) पोस्टवर हिंदू देव-देवतांबद्दलआक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना लातूरमध्ये (Latur) घडली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी लातूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात लोकांना ताब्यात घेतलं आहे. आक्षेपार्ह कॉमेंट करणारा आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शनिवारी यांकाळी पाच वाजता ही घटना घडली आहे. मागहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. डीवायएसपी, चार पोलीस निरीक्षक आणि असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच घटनेतील सर्व दोषींना जेरबंद केलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
घटनेची पार्श्वभूमी...
लातूर येथील एका तरुणाने हिंदू देव-देवतांबद्दल काही दिवसापूर्वी आक्षेपार्ह कॉमेंट सोशल माध्यमातून केली होती. कॉमेंट करणाऱ्या त्या तरुणाला अद्दल घडवण्यात यावी याबाबतचा व्हिडिओ नाशिक येथील एका तरुणांना बनवलं. त्यानंतर लातूर येथील तरुणांनी आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरच त्यास बेदम मारहाण केली होती. त्या सर्व घटनेचा मारहाणीचा व्हिडिओ करण्यात आला. तो व्हिडिओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला होता. काहीच वेळात तो व्हिडिओ व्हायरल झाला. याची माहिती लातूर पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली.
दोन तासात सर्व दोषी ताब्यात
आक्षेपार्ह व्हिडिओ जास्त व्हायरल होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे. लातूर शहर पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरखीले, विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि असंख्य पोलीस कर्मचारी यांनी रात्रीतून मोहीम सुरू केली. अवघ्या दोन तासात यातील जवळपास सर्व दोषी लोकांना ताब्यात घेण्यात आलं. ज्या लोकांनी व्हिडिओ शेअर केला पुढे पाठवला त्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे.
सदरील घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं शहरातील अनेक पोलीस अधिकारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होते. तपास यंत्रणेला वेग दिला होता. पोलिसांनी एकत्रित केलेल्या कारवाईमुळं अवघ्या काही तासात यातील सर्व दोषींना जेरबंद करण्यात यश आलं आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अल्प उत्पन्न गट आणि अर्धशिक्षित तरुणांचा कारणामा
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब ही आहे की यातील दोषी तरुण हे अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. मजुरीच्या कामावर जाणारे हे तरुण कमी शिकलेली आहेत. वेळ मिळेल तेव्हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणे आणि ते व्हायरल करणे हा एकमेव उद्योग ते करत असतात. अशा तरुणांमुळं समाजात द्वेष भावना निर्माण होते. त्यावर वेळीच जरब बसावी म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: