एक्स्प्लोर

Latur News: लातुरात नर्सच्या सल्ल्यावरून सुरक्षारक्षकाचा उपचार; दोघेही निलंबित, गुन्हा दाखल

Latur Health News: डॉक्टरांनी नर्सला उपचार करायचे निर्देश दिले आणि नर्सने ते काम सुरक्षा रक्षकाला सांगितलं, आता या प्रकरणी नर्स आणि सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

Latur Health News: लातूर येथील विलासराव शासकीय देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सच्या सांगण्यावरून एका रूग्णास सुरक्षा रक्षकानेच इंजेक्शन दिल्याचे प्रकरण राज्यभरात खूप गाजले होते. या प्रकरणात आता नर्स आणि खाजगी सुरक्षा रक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. 

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Vilasrao Deshmukh Government College Of Latur) अनागोंदी कारभाराची अक्षरशः मालिका सुरू आहे. अपघातात जखमी असलेल्या एका रुग्णाला नर्सच्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकानेच औषध उपचार केल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. या घटनेची अनेक माध्यमांनी दखल घेतली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना महाविद्यालय प्रशासनाला दिल्यानंतर महाविद्यालय प्रशासनांना तात्काळ कारवाई केली आहे. यात दोषी असलेल्या नर्स आणि सुरक्षारक्षकाला निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

शनिवारी रात्री लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे शब्बीर शेख हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे आणले असता त्यांना वॉर्ड क्रमांक 27 मध्ये दाखल करण्यात आले. या वेळी त्यांना डॉक्टर तपासून गेले आणि डॉक्टरांनी नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश दिले. मात्र नर्सने चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं. सुरक्षा रक्षक उपचार करताना पेशंटच्या नातेवाईकांनी त्याला विरोधही केला. मात्र सुरक्षा रक्षक उपचार करतच राहिला.
     
यावरून सुरक्षा रक्षक आणि पेशंटचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर सदरील प्रकार सांगण्यासाठी पेशंटचे नातेवाईक धावत डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी येऊन नंतर उपचार करत नर्स आणि सुरक्षा रक्षक यांना फैलावर घेतलं.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सोशल माध्यमातही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेला जाग आली. आता त्यांनी चौकशी समिती नेमली आहे. सदरील प्रकार गंभीर असून या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले गेले होते. आता त्या दोघांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अनागोंदी कारभाराची मालिका

कॅन्सर पेशंटला चार दिवस अॅडमिट न करून घेणे, तिसऱ्या माळावरच्या रुग्णांना पाण्यासाठी पहिला माळ्यावर यावे लागणे यासह इतर अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत. तसेच या ठिकाणचे सुरक्षा रक्षक हे उद्धट असल्याची तक्रार अनेकांनी केल्याची माहिती आहे.या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांना सातत्याने मारहाण होत असते. आता तर सुरक्षारक्षकच नर्सच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत असल्याचं दिसून येतंय. असे अनेक अनागोदी प्रकार सुरू आहेत. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget