Latur : लातुरात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदावरून वाद; दगड, पट्टा-काठ्यांनी दोन गटात जोरदार हाणामारी
Latur Crime : अध्यक्षपदावर राज क्षीरसागर यांची निवड झाल्यानंतर दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेतला आणि धारधार शस्त्रांसह, दगड, काठ्यांचा वापर करून जोरदार हाणामारी सुरू झाली.
लातूर : शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात जयंतीनिमित्त (Annabhau Sathe Jayanti) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्ष पदावरून वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी दोन गटात दगड, काठ्या आणि पट्ट्याचा वापर करून जोरदार हाणामारी सुरू झाली. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
लातुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यासाठी सार्वजनिक जयंती महोत्सव कार्यकारिणी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस 150 ते 200 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये अध्यक्षपदी राज क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. मात्र विकास कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी यावरून वादावादी सुरू केली आणि नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
यावेळी धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले. यात पाचजण जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी दहा जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमींमध्ये आकाश लोंढे हा गंभीर जखमी असून, राजेश क्षीरसागर, विकास लोंढे, सूरज लोंढे, विनायक जोगदंड यांचा समावेश आहे.
नववीत शिकणाऱ्या मुलीची वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी
लातूर येथील वसतीगृहात राहणाऱ्या 15 वर्ष वयाच्या मुलीने वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर परिवारातील नातेवाईक विविध सामाजिक संघटना यांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली. ही आत्महत्या नव्हे तर, घातपात आहे, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली. दोषी लोकांना शासन होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली होती.
सायली सिद्धार्थ गायकवाड ही 14 ते 15 वर्षाची मुलगी नववी वर्गात शिकत होती. काहीच दिवसांपर्वी आठवीचा निकाल लागला. लातूरच्या महात्मा गांधी विद्यालय येथे तिचे शिक्षण सुरू होते. मागील एक वर्षापासून ती लातूरच्या कस्तुरबा कन्या छात्रालयात राहत होती. नववीच्या वर्गात जाण्याचा उत्साह तिच्यात होता. यासाठी चाकूर तालुक्यातील आपल्या गावावरून ती लातूरला दाखल झाली. दोनच दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी तिने वसतीगृहाच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
ही बातमी वाचा :