सॉरी मम्मी पप्पा.... आर्थिक विवंचनेतून 17 वर्षीय विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, लातूरमधील घटनेने खळबळ
Latur News : धाराशिव जिल्ह्यातील विजोरा या गावातील एक सतरा वर्षीय विद्यार्थिनी शाहू महाविद्यालयात अकरावी शिक्षण घेत होती. तिची घरची परिस्थिती बेताचीच आहे.
लातूर : शहरातील शाहू महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'मम्मी पप्पा, आय एम सॉरी अशाच माफक स्वरूपात एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये आढळून आली आहे. यामुळे लातूरमध्ये (Latur News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील विजोरा या गावातील एक सतरा वर्षीय विद्यार्थिनी शाहू महाविद्यालयात अकरावी शिक्षण घेत होती. तिची घरची परिस्थिती बेताचीच आहे. तरीदेखील तिच्या आई-वडिलांनी तिला शाहू महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला होता. दहावीत शंभर पैकी 100 गुण घेतले असल्यामुळे ती शिक्षणात उज्वल भविष्य काढेल, असा त्यांना विश्वास होता.
सॉरी मम्मी पप्पा, अशा आशयाची आढळली चिठ्ठी
शिक्षणाचा, वसतीगृहात राहण्याचा आणि खानावळीसह इतर खर्च जास्त होत असल्याने घरातल्या लोकांची ओढाताण होत असल्याची तिला जाणीव झाली. याबाबत ती आपल्या आईकडे सातत्याने नाराजी व्यक्त करत असे. यामुळे वसतीगृहातील स्वतःच्या रूममध्ये गळफास घेत तिने आत्महत्या केल्याचे समोर आलंय. "सॉरी मम्मी पप्पा" असं लिहिलेली एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये सापडल्याचं बोललं जातंय.
'ती' सातत्याने नाराजी व्यक्त करायची
"मुलींचे शिक्षण मोफत आहे. राहण्याचे खाण्याचे आणि इतर खर्च खूप होत असल्याने ती सातत्याने नाराजी व्यक्त करायची. यामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे मत तिच्या आईने पोलिसांकडे व्यक्त केले आहे. 17 ऑक्टोबरला रात्री ही घटना आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
खड्ड्यामुळे बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू
दरम्यान, धाराशिवमध्ये खड्ड्यामुळे एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ओंकार जाधव असे तरुणाचे नाव आहे. सराफ व्यावसायिक असलेला हा तरुण दुकानाहून घरी परतत असताना दुचाकीचा खड्ड्यात पडून अपघात झाला. अपघातात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी सोलापूरला घेऊन जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार जाधवच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ओंकारच्या मित्रपरिवाकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जिजाऊ चौक ते छत्रपती महाराज चौक असा कॅण्डल मार्च काढण्यात आला
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर