एक्स्प्लोर

Latur News : 18 हजार वह्या, 20 कलाकार, 3 दिवस; 11 हजार चौरस फूटावर साकारली बाबासाहेबांची मोझेक कलाकृती

Latur News : खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचं भव्यदिव्य चित्र साकारण्यात आलं आहे.

लातूर : लातूर शहरातल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्कवर बाबासाहेबांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे, वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ही कलाकृती 11 हजार चौरस फूट जागेवर 18 हजार वह्या आणि 20 कलाकारांनी 3 दिवसांत साकारली आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर वह्यांनी उभारण्यात आलेली ही देशातील पहिलीच चित्राकृती आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कलाकृतीचे उद्घाटन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पाटील कव्हेकर, शंकर शृंगारे, रागिणी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांना अभूतपूर्व पद्धतीने अभिवादन करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांनी या चित्राची विक्रमी नोंद झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. 

वह्यांच्या माध्यमातून मोझेक पद्धतीने साकारण्यात आलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील हे पहिले चित्र आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर साकारलेली ही कलाकृती पाहण्यासाठी किंवा चित्रासोबत सेल्फी घेता यावा, यासाठी मोठा उंच रॅम्प याठिकाणी उभारण्यात आला आहे. एका वेळी दहा लोक सेल्फी घेऊ शकतील असा हा रॅम्प आहे.  मंगळवारपासून नागरिकांसाठी हे चित्र खुले करण्यात आले आहे. तर आज आणि उद्या हे चित्र नागरिकांसाठी खुले असणार आहे. 13 एप्रिल रोजी मध्यरात्री तोफांची सलामी देऊन हे चित्र काढण्यात येईल. या चित्राकृतीसाठी वापरण्यात आलेल्या वह्या या लातूर लोकसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरजू मुलांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. या चित्राला चारही बाजूने कंपाउंड करून सुरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांना हे चित्र स्पष्ट दिसावे यासाठी एलईडी वॉल देखील लावण्यात आले आहे. दिवसा  सूर्यप्रकाशात हे चित्र  वेगळे दिसते आहे तर  संध्याकाळी लाईट्सच्या इफेक्टमध्ये हे चित्र आणखीनच नजरेत भरते. 

दरम्यान, गेल्या वर्षी खासदार सुधाकर शृंगारे यांनी 72 फूट उंचीची डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती उभारली होती. हा उपक्रम देखील आगळा-वेगळा ठरला होता. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री सेवालाल महाराज जयंती, रंगपंचमी, रामनवमी,  असे अनेक उत्सव नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविले गेले आहेत.  हे चित्र पूर्ण करण्यासाठी आयोजकांच्या वतीने स्टारडस्ट  ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत. या चित्राकृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget