Kolhapur Crime : लातूर जिल्ह्यातील तरुणास आजरा तालुक्यात ट्रकसह लुटले
Kolhapur Crime : लातूरमधील तरुणाला कोल्हापूरच्या आजऱ्यात ट्रकसह लुटल्याची घटना खळबळजनक घटना घडली आहे. भारत बेंज ट्रकसह आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी लुटले.
Kolhapur Crime : लातूरमधील तरुणाला कोल्हापूरच्या आजऱ्यात ट्रकसह लुटल्याची घटना खळबळजनक घटना घडली आहे. अशोक पोवार असे त्यांचे नाव आहे. भारत बेंज ट्रकसह आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी त्यांना लुटले. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास आजरा-आंबोली रस्त्यावरील जंगल क्षेत्रात घडली. अशोक पोवार पहाटे शुद्धीवर आल्यानंतर हातपाय घासत रस्त्यावर आले. त्यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लुटमार झालेला सदरचा तरुण रात्रभर पावसात काळोख्या जंगलात हात, पाय, तोंड बांधून टाकल्याने भेदरलेल्या अवस्थेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पोवार यांना बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कणकवलीच्या पुढे येऊन गाडी आडवी लावली. दरवाजा उघड नाही, तर काच फोडणार अशी धमकी दिल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर गाडीतील दोन तरुण ट्रकमध्ये बसले. या तरुणांनी त्यांना सावंतवाडीपर्यंत आणले. त्या ठिकाणी त्याच्या ताब्यातील ट्रक काढून घेऊन त्याला बोलेरो गाडीत घालून आजऱ्याकडे परत आले.
आंबोलीच्या पोलीस चेक पोस्ट नाक्याला अशोक पोवार यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचे तोंड दाबून अंगावर दोघेजण बसले आणि तिथून ते पुढे आले. आजरा-आंबोली रोडवरील तुळशी धाब्याजवळ अशोक पोवार यांचे हात पाय तसेच तोंडाला बांधून प्रचंड मारहाण करुन जंगल क्षेत्रात नेऊन टाकले. त्या ठिकाणाहून हे चार तरुण पसार झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif : वेळ आल्यास लोकसभेला शड्डू ठोकणार का? विचारताच हसन मुश्रीफ काय म्हणाले?
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा
- Sanjay Mandlik : बंटी पाटलांच्या ताकदीने विजयी गुलाल उधळला अन् आता शिंदे गटात, जाणून घ्या खासदार संजय मंडलिकांची राजकीय कारकिर्द
- Sanjay Pawar : कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर