एक्स्प्लोर

कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्ती लवकरच होणार; काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला थेटपाईपलाईनने पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलला पाणी पोहोचले!

गेल्या 24 तासांमध्ये धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे काळम्मावाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या थेट पाईलपाईलन योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले आहे.

Kolhapur Direct Pipeline: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि कोल्हापूरचे (Kolhapur News) दीर्घकाळ स्वप्न असेल्या थेट पाईपलाईन योजनेमधील (Kolhapur Direct Pipeline) मैलाचा टप्पा पार झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे काळम्मावाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या थेट पाईलपाईलन योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या पाईपलाईनसाठी पाठपुरावा करत असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली आहे. 

सतेज पाटील (Satej Patil on Kolhapur Direct Pipeline) यांनी म्हटले आहे की, स्वप्नपूर्तीचा क्षण. संततधार पावसामुळे काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेटपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचले आहे. आपल्या स्वप्नांना निसर्गाचीही साथ लाभत आहे. एक वेगळेच आत्मिक समाधान आज मनात आहे.

आता पंपिंग यंत्रणेच्या माध्यमातून पाणी उपसले जाईल

थेट पाईपलाईन योजनेतील महत्वाचा टप्पा असलेल्या जॅकवेलचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची प्रतीक्षा होती. मात्र, धरणातील पाण्याने यंदा तळ गाठल्याने कोल्हापूरकरांच्या मनात हुरहूर सुरु होती. काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी थेट पाईपलाईन योजनेच्या इंटेक विहिरीच्या पातळीपेक्षाही अधिक खालावली होती. जवळपास तीन मीटरने पातळी खाली गेली होती. धरणात 609 मीटरवर पाणीपातळी गेल्यानंतर जॅकवेलमध्ये पाणी येण्यास सुरुवात होणार होती. आज सकाळी धरणाची पाणीपातळी 613.49 मीटरवर पोहोचल्याने मोठा टप्पा पार पडला आहे. त्यामुळे इंटेक विहिरीतून जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले. जॅकवेलमध्ये पाणी आल्याने आता पंपिंग यंत्रणेच्या माध्यमातून पाणी उपसले जाईल. उपसलेले पाणी पुईखडीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. शुद्धीकरण प्रकल्पही पूर्ण झाला आहे.

वीजवाहिन्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू

दुसरीकडे पुईखडीपर्यंतची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. त्यातील काही जोड स्थानिकांच्या विविध मागण्यांमुळे पूर्ण झाले नव्हते. त्यात हळदी, अर्जुनवाडा गावांतील कामाचा समावेश होता. कोल्हापूर मनपाचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढला आहे. दोन जोड पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. दुसऱ्या बाजूने वीजवाहिन्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. तर जॅकवेलवरीलपंप हाऊसचे काम पूर्णत्वाला जात आहे. उपसा पंप जोडण्यासाठी तयारी सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणीMumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रमMumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहितीMumbai Boat Accident : नेवीच्या स्पीट बोटने जोरात ठोकलं,बोटीच्या मालकानं धक्कादायक माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget