एक्स्प्लोर

Vishalgad Encroachment : विशाळगड परिसरात जाळपोळ, वाहनांची, घरांची तोडफोड; पुण्याचे रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखेंसह 500 लोकांवर गुन्हे

पुण्यातील रवींद्र पडवळ आणि आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वात विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. पोलीस तापासामध्ये आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच घरांची तोडफोड करण्यात आली. यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशाळगड परिसरात झालेले हिंसाचारानंतर पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर जाणार अशी भूमिका घेतलेल्या संभाजी राजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, 500 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 132,  189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह  पोलिस अधिनियम 37 (1) उल्लघन 135  या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील रवींद्र पडवळ आणि आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वात विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. पोलीस तापासामध्ये आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून कोल्हापूर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. 

रात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात, कायदा, सुव्यवस्थेची घेतली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात जाऊन मध्यरात्री विशाळगडाची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात कोल्हापूरच्या आयजींकडून विशाळगडाबाबत तसेच येथील परिस्थिती माहिती घेतली आहे. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी त्यांनी आवश्यक तो बंदोबस्त करावा, असे सांगितले आहे. त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही आयजींसोबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून रात्री एक वाजता थेट कोल्हापूरची वाट धरली आणि विशाळगडाच्या अतिक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली.

विशाळगडावर तोडफोड, दगडफेकीच्या घटना

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी घेऊन 14 जुलै रोजी काही शिवभक्त विशाळगडावर गेले होते. यावेळी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुसरीडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Embed widget