एक्स्प्लोर

मोठी बातमी: मुख्यमंत्री मध्यरात्री कोल्हापुरात, विशाळगड वादाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील मोर्चा वळवला

विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाला हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.

कोल्हापूर : स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरील अतिक्रमाणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. या गडावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीला घेऊन संभाजीराजे काल विळागडावर जाण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर गडावर तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी काल मध्यरात्री कोल्हापुरात येऊन विशाळगडाची पाहणी केली आहे.  

रात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात, कायदा, सुव्यवस्थेची घेतली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात जाऊन मध्यरात्री विशाळगडाची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात कोल्हापूरच्या आयजींकडून विशाळगडाबाबत तसेच येथील परिस्थिती माहिती घेतली आहे. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी त्यांनी आवश्यक तो बंदोबस्त करावा, असे सांगितले आहे. त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही आयजींसोबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून रात्री एक वाजता थेट कोल्हापूरची वाट धरली आणि विशाळगडाच्या अतिक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली.

विशाळगडावर तोडफोड, दगडफेकीच्या घटना

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी घेऊन 14 जुलै रोजी काही शिवभक्त विशाळगडावर गेले होते. यावेळी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुसरीडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.   

पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास सुरुवात 

दरम्यान, विशाळगड परिसरात  जाळपोळ, वाहनांची आणि घराची तोडफोड केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचे रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.  संभाजीराजे यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा :

Vishalgad Encroachment : विशाळगडावरील परिस्थिती नियंत्रणात, दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार; पोलिसांनी दिली माहिती

Vishalgad Encroachment : विशाळगडावर स्थानिकांना मारहाण, दगडफेकीचा आरोप; पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणारPune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget