एक्स्प्लोर

Vishalgad : संभाजीराजेंच्या आंदोलनाला यश, पहिल्या दिवशी विशाळगडावरील 70 अतिक्रमणे हटवले

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारलं होतं. 

कोल्हापूर: संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश आलं असून पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मंगळवारी पुन्हा अतिक्रमण हवटण्याचं काम सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली असून 400 पेक्षा अधिक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी संभाजीराजे यांनी आंदोलन छेडलं होतं. 

किल्ले विशाळगडावरील विविध प्रयोजनाकरिता केलेली अतिक्रमणे काढणे बाबत, प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागविणेत आले होते. ते अभिप्राय 15 जुलै 2024 रोजी प्राप्त झाले असून त्यामध्ये उच्च न्यायालयात व इतर न्यायालयात ज्या याचिकाकर्त्यांना स्थगनादेश आहे, ती वगळून इतर अतिक्रमणे काढता येतील असे नमूद केले आहे. बंधित अभिप्राय मिळताच प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम काढणेस प्रारंभ केला.

प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात 

मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढणेत आली. यामध्ये व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली अतिक्रमणे काढणेत आली. सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे 90 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागासह त्यांनी 150 मजूर उपलब्ध केले तसेच पुरातत्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी भाग घेतला. पोलीस विभागाचे 250 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी उपस्थित होते.

या मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी पन्हाळा-शाहूवाडी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी आप्पासाहेब पवार, तहसिलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, सहा. संचालक पुरातत्व विभाग विलास वहाणे, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता सा.बां विभाग धनंजय भोसले, गट विकास अधिकारी शाहूवाडी मंगेश कुचेवार यांनी आपला सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. मात्र संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. त्या हिंसाचारामध्ये वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली होती.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?Antarwali Sarati Strike : आंतरवाली सराटीत तीन आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget