Hasan Mushrif : राजकीय जीवनात दोन मोठी संकट माझ्यावर आली; अजित पवारांसमोर हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
Hasan Mushrif : राजकीय जीवनात दोन मोठी संकट माझ्यावर आली. या काळातही जनताच माझ्या सोबत राहिली असे सांगताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे भाषण करता करता हसन मुश्रीफ रडले.
कागल (कोल्हापूर) : आजपर्यंत अजितदादांनी अनेकवेळा मंत्रीमंडळात संधी दिली, पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं, ती सुद्धा संधी दादांनी दिली, मी शब्द देतो महायुतीमधील ऐकाही पक्षाची तक्रार येणार नाही, असा निर्धार कोल्हापूरचे पालकमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. विकासाच्या बाबतीत कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, अंबाबाई मंदिर विकास आराखडा आपण येत्या बजेटमध्ये मंजूर करा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी अजित पवार यांना केले. दादा आप आये बहार पहले बहार आयी है, प्रोत्साहनपर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
भाषण करता करता हसन मुश्रीफ रडले
हसन मुश्रीफ म्हणाले की, तुमच्या (अजित पवार) ताकदीवर अनेक संकट पेलून मी उभा आहे. या जनतेचा मी आभारी आहे. राजकीय जीवनात दोन मोठी संकट माझ्यावर आली. या काळातही जनताच माझ्या सोबत राहिली असे सांगताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे भाषण करता करता हसन मुश्रीफ रडले. आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचं भाग्य मला मिळाल्याचे मुश्रीफ म्हणाले. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी उद्याच प्रामाणिक कर्जफेड बाबत तांत्रिक अडचणींवर चर्चा करणार असल्याचे सांगितले.
दादांनी घेतलेली भूमिका योग्य
दरम्यान, मुश्रीफ यांनी बोलताना राष्ट्रवादी फोडून भाजपला मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, अचानक एक राजकीय भूकंक ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेनं मला समजून घेतलं.
आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतीच्या पाण्याचे वाढवलेले दर कमी केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. राजकारणात वेळेला खूप महत्व असतं, काम करायला वेळ लागणार म्हणून सत्तेत गेलो. नाहीतर आमचं सरकार आणा, आमदार आणा मग काम करतो अशी आश्वासन देत फिरावं लागलं असतं. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. बघू, करू, नंतर करू असं म्हणत बसत नाही. सत्तेत गेल्यानंतर दर मंगळवारी माझ्या बंगल्यावर पक्षाचे आमदार आणि मंत्री यांची बैठक घेतो. काय करायला पाहिजे, आठ दिवस केलेल्या कामाचा आढावा घेतो. आलेल्या त्रुटींवर चर्चा केली जाते.
इतर महत्वाच्या बातम्या