(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#SSCResultonmajha : दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींची बाजी
कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे.
SSC 10th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. निकालामध्ये बारावीनंतर कोकण विभागाने बाजी मारली असून कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या वर्षीची दहावी परीक्षा 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 दरम्यान पार पडली होती
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. त्याशिवाय, MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करून थेट निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या परीक्षेला 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458 एवढी आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना जलद निकाल पाहता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल ?
- स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
- स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
- स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
- स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
- स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
- स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
प्रभागनिहाय निकाल (टक्केवारी)
- पुणे : 96.16
- नागपूर: 97.00
- औरंगाबाद: 96.33
- मुंबई: 96.94
- कोल्हापूर: 98.50
- अमरावती: 96.81
- नाशिक: 95.90
- लातूर: 97.27
- कोकण: 99.27