एक्स्प्लोर

Radhanagari Dam : पावसाचा जोर ओसरला, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, अजूनही तीन दरवाजातून विसर्ग सुरु 

Radhanagari Dam : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे आज दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. आज सायंकाळी 4 च्या सुमारास स्वयंचलित चौथा दरवाजा बंद झाला.

Radhanagari Dam : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे आज दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. आज सायंकाळी 4 च्या सुमारास स्वयंचलित चौथा दरवाजा बंद झाला. सकाळी 10 च्या सुमारास तिसरा दरवाजा बंद झाला होता. राधानगरी धरणाचे सध्या 3 दरवाजे (5,6,7) उघडे आहेत. यामधून 4 हजार 284 क्युसेक विसर्ग पाण्यातून होत आहे. पाॅवर  हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भोगावती नदी पात्रात एकूण 5 हजार 884 क्युसेक विसर्ग सुरू आहे. 

पंचगंगेची पाणी पातळी स्थिर 

पंचगंगेच्या पाणी पातळीत राजाराम बंधाऱ्यावर स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर दोन दिवसांपासून ओसरल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असली, तरी धोका पातळीला पोहोचलेली नाही. दुपारी 3 वाजता पंचगंगेची पातळी 41 फुट 7 इंचावर स्थिर आहे. आज दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील अजूनही 76 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली आहेत?

  • पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
  • भोगावती नदी- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे
  • कासारी नदी- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी
  • कडवी नदी- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर
  • वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली
  • घटप्रभा नदी- कानर्डे सावर्डे, हिंडगांव व अडकूर
  • वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगलेसावर्डे, चावरे व दानोळी
  • दुधगंगा नदी- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवे
  • कुंभी नदी- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली
  • तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी
  • ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड, हल्लारवाडी व कोकरे 
  • धामणी नदी- सुळे व आंबर्डे
  • हिरण्यकेशी नदी- निलजी, ऐनापूर, गिजवणे व चांदेवाडी

Bhuibawada Ghat : भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली

आज सकाळी शाहूवाडी तालुक्यामध्ये भूस्खलनची घटना झाल्यानंतर आता भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे. यासंदर्भात गगनबावडा पोलीस ठाण्याकडून माहिती देण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget