Kolhapur Crime : विवाहितेची आत्महत्या; पती आणि प्रेयसीने शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाळवेकरवाडीत विवाहितेने 16 डिसेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. भावाने बहिणीचा पती आणि प्रेयसीने छळ करून आत्महत्येस प्रवृत केल्याची फिर्याद दिली आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) पन्हाळा तालुक्यातील वाळवेकरवाडीत विवाहितेने 16 डिसेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर विवाहितेच्या भावाने आपल्या बहिणीचा पती आणि प्रेयसीने छळ करून (physical torture) आत्महत्येस प्रवृत केल्याची फिर्याद दिली आहे. नीशा बाजीराव वाळवेकर (वय 30) असे आत्महत्या केलेल्य विवाहितेचं नाव असून तिने आपल्या माहेरीच आत्महत्या केली होती. मात्र, नीशाचा भाऊ सुजित बंडू लवटे (रा. वाळवेकरवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याने बहिण नीशाने पती बाजीरावला ब्हाॅट्सअॅपमधून पाठवलेला फोटोतील मजकूर असलेली वही सापडल्यानंतर कळे पोलिसात फिर्याद दाखल केली.
सुजितने दिलेल्या फिर्यादीनंतर बाजीराव रंगराव वाळवेकर, काश्मीरी गमरे, पराग गमरे आणि मानसी गमरे यांच्याविरोधात कळे पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बाजीरावच्या असलेल्या प्रेमसंबंधामुळे नीशाचे त्याच्याशी खटके उडत होते. मात्र, बाजीरावच्या वागण्यात कोणताच बदल न झाल्याने नीशाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
आत्महत्यांचे सत्र सुरुच
दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Crime) आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी किरकोळ कारणातूनही टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केली होती. यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे.
करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने मंगळवारी पहाटे राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. एकुलत्या एक असलेल्या लेकीने उचललेल्या टोकाच्या पाऊलाने आई वडिल मुळापासून हादरून गेले आहेत. दोन मुलींनी आत्महत्या केल्याने सातपुते कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट
दुसरीकडे त्याच्या दोन दिवसांपूर्वीच पन्हाळा तालुक्यामध्येच (Kolhapur Crime) कोडोली साखरवाडीत मामाच्या झालेल्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. श्रद्धा धर्मेंद्र कांबळे (वय 24) असे त्या तरुणीचे नाव आहे. धर्मेंद्र कांबळे यांना श्रद्धा एकूलती एक मुलगी होती. तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून पुण्यात एका कंपनीमध्ये कार्यरत होती. मामा संचित कांबळे (उदगाव, ता. शिरोळ) यांच्या निधनानंतर श्रद्धा नैराश्यात गेली होती. या नैराश्यात असतानाच श्रद्धाने दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.
इतर महत्वाच्या बातम्या























