एक्स्प्लोर

Kolhapur News : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur News : कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पुरस्कार मिळाला आहे. 

Kolhapur News : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टांची 100 टक्के पूर्तता केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होवून जिल्ह्याला चौथा क्रमांक मिळाला आहे. कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट अवैद्यकीय पर्यवेक्षक अनिल शास्त्री, अवैद्यकीय सहाय्यक डी. एम. मंदुळकर तसेच सांख्यिकी सहाय्यक निशांत कुंदे यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, जे. जे. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईचे प्राध्यापक  डॉ. ललित संख्ये, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबईचे संचालक डॉ. सुनिल गिते व पीएचएसजी-1 एएचओ मुंबईचे डॉ. विजय भगत यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पुरस्कार

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 वर्षामध्ये नवीन कुष्ठरुग्ण शोध कार्य उद्दिष्टांची पूर्तता तसेच विकृती दर्जा दोनच्या रुग्णांचे प्रमाण कमी असणे, लहान वयातील मुलांची रुग्ण संख्या कमी असणे तसेच विकृती असलेल्या रुग्णांना भौतिकोपचार व त्यांना आवश्यक असलेल्या सेवा 100 टक्के पुरवण्यात आल्याबद्दल जिल्ह्याला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पुरस्कार मिळाला आहे. 

यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी परिश्रम घेतले. डॉ. उषादेवी कुंभार यांनी कुष्ठरोग कार्यक्रमाचा तालुका स्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तराचा नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच कुष्ठरोग शोध अभियान, स्पर्श जनजागृती अभियान अंतर्गत वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे कुष्ठरोग कार्यक्रम चांगल्या पध्दतीने राबविण्यात आला. 

वैद्यकीय अधिकारी, डीएनटी, वैद्यकीय अधिकारी सुलु सर्व अवैद्यकीय पर्यवेक्षक, अवैद्यकीय सहाय्यक, कुष्ठतंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक,तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुका स्तरावरील आरोग्य सहाय्यक व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक, सर्व आशा स्वयंसेविका यांचेही कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत सर्व उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले. राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल डॉ. उषादेवी कुंभार यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur: देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचा एल्गार; नागपुरात निवडणूक आयुक्ताचा पुतळा जाळला; तर आंदोलनामागे शहरी नक्षलवाद्यांचे डोके, परिणय फुकेंचा आरोप
देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचा एल्गार; नागपुरात निवडणूक आयुक्ताचा पुतळा जाळला; तर आंदोलनामागे शहरी नक्षलवाद्यांचे डोके, परिणय फुकेंचा आरोप
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget