एक्स्प्लोर

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल

Election Commission Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

Gyanesh Kumar High Court Petition : निवडणूक आयोगाच्या (ECI) पारदर्शकतेवरून देशात राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना थेट आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात (Kolhapur Bench) दाखल करण्यात आली आहे.

Advocate Asim Sarode Petition : कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

ही महत्त्वपूर्ण याचिका प्रथमेश गोपाळ गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या बाजूने प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांच्यासह वकिलांचे पथक न्यायालयात बाजू मांडत आहे. या याचिकेशी संबंधित प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत,

14 वेळा आक्षेप: निवडणूक आयोगाच्या दोन इतर आयुक्तांनी विविध निर्णय आणि प्रक्रियांबाबत तब्बल 14 वेळा तीव्र आक्षेप नोंदवल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

मतदार यादीतील गैरव्यवहार: मतदार नोंदणी, मतदारांची नावे अचानक वगळणे (Deletion of Names), मतदार यादीचा डेटाबेस, ERO कार्यपद्धती आणि ECINet प्रणालीशी संबंधित गंभीर प्रश्न या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत.

Gyanesh Kumar Dispute Legal Questions : नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा

'मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, 2023' (Chief Election Commissioner Act 2023) अंतर्गत निवडणूक आयोगाचे निर्णय सामूहिक पद्धतीने घेणे बंधनकारक आहे. मात्र, या कायद्यातील तरतुदींचे पालन न करता निर्णय एकतर्फी घेतले गेले का? असा थेट कायदेशीर प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

SIR Process Maharashtra : महाराष्ट्रातील 'SIR' प्रक्रिया थांबवण्याची मागणी

या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडे काही अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:

SIR प्रक्रियेला स्थगिती: महाराष्ट्रात सुरू असलेली एसआयआर (SIR) प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी.

नावे पुनर्स्थापित करणे: एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून ज्या मतदारांची नावे अनधिकृतपणे वगळण्यात आली आहेत, ती नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट (Restore) करावीत.

स्वतंत्र न्यायिक समिती: मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र न्यायिक समिती स्थापन केली जावी.

कोल्हापूर खंडपीठात ही याचिका दाखल झाल्याने आता निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यापुढील कायदेशीर अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यावर उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Embed widget