Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
ज्या काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे सोबत नकोत म्हणून वेळप्रसंगी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्याच काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे राहुल गांधी राज ठाकरेंच्या संपर्कात असतील का? राज ठाकरे आणि राहुल गांधी एकमेकांशी संवाद साधत असतील का? हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे खासदार संजय राऊतांनी केलेलं मोठं स्टेटमेंट... काय म्हणालेत संजय राऊत? आणि राऊतांच्या दाव्यावर राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलीय.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट..
रोज सकाळी पत्रकार परिषद घेणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यांनी एक ब्रेकिंग न्यूज दिली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी....
हे एकमेकांच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला..
आणि पत्रकारांच्या देखील भुवया उंचावल्या..
काही पत्रकारांनी संजय राऊतांना पुन्हा याच मुद्द्यावर प्रतिप्रश्न केला
All Shows
































