Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
मुंबई -
चाकण-हिंजवडीसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला तत्वतः मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
चाकणसाठी १,४०० कोटींचा विकास आराखडा
हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींची कामे प्रस्तावित
डिसेंबरपासून विकासकामे सुरू करण्याचे नियोजन
पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्यात सुधारणा करण्याचे उद्दिष्ट
चाकणमध्ये ७५ किमी रस्त्यांची प्राधान्याने सुधारणा
पादचारी मार्ग आणि सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा
पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी ३८ किमी गटार व्यवस्था
नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू
जून २०२७ पर्यंत नाले मोकळे करण्याचे उद्दिष्ट
ग्राफिक्ससाठी -
- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ५०० अतिरिक्त बसचे नियोजन
* पुणे आणि पिंपरी-चिंचवडहून चाकणसाठी बससेवा वाढवणार
* सहा प्रमुख चौकांची पुनर्रचना
* अनधिकृत दुभाजक हटवून नियोजित ठिकाणी यू-टर्नची सुविधा
चाकणमध्ये AI आधारित वाहतूक नियंत्रण व्यवस्था
* AI सिग्नल, सीसीटीव्ही आणि रडार यंत्रणा
* वाहन क्रमांक ओळख प्रणाली
* कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणार
* १ ऑक्टोबरपासून चाकणसाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान
पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापनावरही भर
* चाकण पाणीपुरवठा योजना २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन
* १०० MVA वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरपासून सुरू होणार
* १४ गावे आणि २ नगर परिषदांसाठी केंद्रीकृत कचरा प्रक्रिया केंद्र
हिंजवडीसाठीही ४२६.५४ कोटींचा आराखडा
* वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा
* वीजपुरवठ्यासाठी ६ एकर जागा उपलब्ध
* वाहतूक व्यवस्थापनासाठी १०० सुरक्षा जवान उपलब्ध करण्याची प्रक्रिया
* हिंजवडीतील कचरा संकलनासाठी महापालिकांच्या माध्यमातून व्यवस्था
ग्राफिक्स आऊट





















