एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hatkanangle Lok Sabha constituency : हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात ठाकरेंचा शिवसैनिक मैदानात; कोण आहेत सत्यजीत पाटील?`

Hatkanangle Lok Sabha constituency : कोल्हापूर काँग्रेसला दिल्याने हातकलंगलेमध्ये ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे. याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे रिंगणात आहेत.

Hatkanangle Lok Sabha constituency : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये (Hatkanangle Lok Sabha constituency) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) उमेदवार देणार, नाही देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच आता ठाकरे गटाकडून हातकणंगले लोकसभेला उमेदवार देण्यात आला आहे. या ठिकाणी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने आता या ठिकाणी चौरंगी लढत होईल. 

राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतरे सुरू होती. राजू शेट्टी यांनीही मतदारसंघातील अंदाज घेत उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा मागितला होता. मात्र, त्यांनी मशाल चिन्हाचा प्रस्ताव दिल्याने तसेच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिल्याने  ठाकरेंकडून उमेदवार देण्यात आला आहे. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांचा बाहेरून पाठिंबा मागितला होता. मात्र ठाकरेंकडून मशालवर नाव लढण्याचा प्रस्ताव आल्यानंतर राजू शेट्टी यांनी नकार देत तटस्थ भूमिका घेतली आहे. 

कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने हातकलंगलेमध्ये ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे. याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे रिंगणात आहेत, तर महायुतीकडून धैर्यशील माने, वंचितकडून डी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरूडकर असे चार उमेदवार रिंगणात असल्याने आता या मत विभागणीचा फायदा नेमका कोणाला होणार याचे उत्तर 4 जून रोजी होणाऱ्या निकालामध्ये समजणार आहे. 

कोण आहेत सत्यजित पाटील सरुडकर?

सत्यजित सरूडकर शिवसेना ठाकरे घराण्याचे निष्ठावंत शिवसैनिक समजले जातात. त्यांनी शाहूवाडी-पन्हाळा या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 2004 मध्ये कोल्हापूरमध्ये ते एकमेव सेना आमदार होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनय कोरे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, त्यांनी लाखाच्या घरात मते घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी 2004 आणि 2014 च्या विधानसभेमध्ये दोनवेळा आमदारकी मिळवली होती. 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या कर्णसिंह गायकवाड यांचा पराभव करून पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती. त्यानंतर त्यांना 2009 मध्ये पराभवला सामोरे जावे लागले. 2014 मध्ये त्यांनी विनय कोरे यांच्याविरुद्ध विजय खेचून आणला होता. मात्र  2019 मध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून पाटील यांचा मातोश्रीशी घनिष्ठ संबंध राहिला आहे. 

मतदारसंघात राजकीय बलाबल कस आहे?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार या ठिकाणी आहेत. जयंत पाटील आणि मानसिंग नाईक हे दोन आमदार या मतदारसंघात आहेत. हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे आमदार आहेत, तर इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे आमदार असून ते भाजप समर्थक आहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळचे आमदार असून ते शिंदे गटाचे आहेत. विनय कोरे  जनसुराज्य शक्तीचे आमदार आहेत. 

त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणि दुया मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तीन माजी आमदार असल्याने सुद्धा सरूडकर यांना चांगली मदत होऊ शकते. सुजित मिणचेकर हे सुद्धा हातकणंगलेमधून माजी आमदार आहेत, तर उल्हास पाटील सुद्धा शिरोळमधून माजी आमदार आहेत. दुसरीकडे हातकलंगले मतदारसंघातून विद्यमान आमदार राजू  आवळे आमदार आहेत.

मानेंना नाराजी भोवणार?

दुसरीकडे या मतदारसंघांमध्ये महाडिक गट सुद्धा ताकद राखून आहे. मात्र, त्यांची मदत आता कोणाला होणार यावरही गणित अवलंबून आहे. महाडिक गटाने गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ताकद लावली होती. मात्र, उमेदवारी शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना मिळाली आहे. त्यामुळे महाडिक गट मदत करतो की नाही यावर सुद्धा गणित अवलंबून असणार आहे. आवाडे सुद्धा मानेंच्या विरोधात आहेत. शाहूवाडी तालुक्यातही मानेंविरोधात प्रचंड नाराजी आहे. 

शेट्टींनी मतदारसंघ पिंजून काढला

दुसरीकडे, राजू शेट्टी यांनी खासदारकी नसताना गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघ पिंजून काढताना विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलन केली आहेत. शेतकऱ्यांना शंभर रुपये मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मात्र, आचारसंहिता लागल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत. ऊस दरासाठी मोठा संघर्ष करून साखर सम्राटांना घाम फोडला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Embed widget