एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Satej Patil on Hasan Mushrif : सतेज पाटलांना इतका बालीशपणा कुठून आला समजत नाही, हसन मुश्रीफांचा थेट हल्लाबोल!

Satej Patil on Hasan Mushrif : आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची भावना होती असे हसन मुश्रीफ स्पष्ट केले. 

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर (Maha Viksa Aghadi) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर महायुतीमधून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा महायुतीमधील वजनदार नेते हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आदरणीय स्थान असून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, असे वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती. आता आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेत जर महाराजांबद्दल आदर असेल, तर ही निवडणूक बिनविरोध करा, असा टोला लगावला होता. आता मुश्रीफ (Hasan Mushrif on Satej Patil) यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत पाटील यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. 

इतका बालिशपणा कुठून आला?

हसन मुश्रीफ म्हणाले की, सतेज पाटलांकडे इतका बालिशपणा कुठून आला? हे समजत नसल्याचे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकारणामध्ये असं काही होत नसतं. आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची भावना होती असे त्यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा, मुश्रीफ काय म्हणाले?

दरम्यान महायुतीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये संजय मंडलिक यांचा पत्ता कट करून भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी सुद्धा सूचक विधान करत भूमिका स्पष्ट केली.  ते म्हणाले की, तिन्ही पक्ष मिळून उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील, त्यामागे ठामपणे उभा राहणार असल्याचे ते म्हणाले. दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडाचं काडं रक्ताचे पाणी करेन, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. मात्र,कोण उमेदवार दिला जाणार? याबाबत मला माहिती नसल्याचे ते म्हणाले. मात्र, जो उमेदवार देतील त्याचा मला प्रचार आणि नेतृत्व करावं लागेल, असे त्यांनी नमूद केले. दुसरं काही करण्याचा आमचा स्वभाव नसून आज आमच्या डोळ्यासमोर संजय मंडलिक हेच उमेदवार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

संजय मंडलिकांचा सुद्धा खोचक टोला

संजय मंडलिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली होती. पाटील यांनी यादी द्यावी, सर्वच निवडणुका बिनविरोध करा. मोदींना देखील बिनविरोध पंतप्रधान करा अशी मागणी त्यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी तयारी गेल्या पाच वर्षांपासून केली आहे. उमेदवार सुद्धा मीच असेल आणि जिंकून सुद्धा येणार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले होते.  शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे, पण ही निवडणूक वैचारिक आहे. सतेज पाटील यांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध कराव्यात. शिंदे गटातील विद्यमान खासदारांनी कोणताही दबाव गट तयार केलेला नाही. ज्यावेळी आम्ही पाठिंबा दिला त्यावेळी विद्यमान खासदार उमेदवार असतील असे सांगण्यात आलं होतं असेही संजय मंडलिक म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget