Sambhajiraje Chhatrapati : संयोगीताराजेंनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान, आजही मंदिरात अपप्रवृत्ती; संभाजीराजेंनी 'वेदोक्त' प्रकरणावर मांडली भूमिका
Kolhapur : पगारी पुजारी नेमायला पाहिजेत. जुन्या परंपरा कशा आहे त्याची चर्चा होऊन सगळं झालं पाहिजे. महंत कोल्हापुरात आले की त्याठिकाणी काय काय घडलं हे सर्वांसमोर मांडतो, असेही त्यांनी सांगितले.
Sambhajiraje Chhatrapati on Vedokta in Kalaram Mandir : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले होते. यानंतर आता या प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. संयोगीताराजेंनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान असून आजही मंदिरात अपप्रवृत्ती असल्याचे संभाजीराजे म्हणाले. पगारी पुजारी नेमायला पाहिजेत. जुन्या परंपरा कशा आहे त्याची चर्चा होऊन सगळं झालं पाहिजे. महंत कोल्हापुरात आले की त्याठिकाणी काय काय घडलं हे सर्वांसमोर मांडतो, असेही त्यांनी सांगितले.
संभाजीराजे काय म्हणाले?
मंदिरातील अपप्रवृत्तीचा संयोगीताराजे यांना काळाराम मंदिरात त्याचा अनुभव आला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांना आलेला अनुभव परखडपणे मांडला त्याचा मला खूप अभिमान आहे. असे कृत्य करणारे लोक निर्माण होऊ नयेत, असे माझे मत आहे. वेदोक्त प्रकरणावर दीड महिन्यांनी बोलल्या म्हणजे त्या विचार करून बोलल्या आहेत. त्यावेळी माझा वाढदिवस होता म्हणून बोलल्या नाहीत.
महंतांनी मोठ्या महाराजांना भेटले पाहिजे
संभाजीराजे यांनी पुढे सांगितले की, संयोगीताराजे कधी राजकीय व्यासपीठावर गेलेल्या नाहीत, पण त्यांनी जे स्पष्टपणे मांडलं त्याचा सार्थ अभिमान आहे. आजही मंदिरात अपप्रवृत्ती आहेत ते बदलणे गरजेचे आहे. अपप्रवृत्ती करणारे लोक आहेत त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे. दरम्यान, महंतांनी मोठ्या महाराजांना भेटले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, जो महंत आहे त्यांचे पार्श्वभूमी काय आहे हे देखील तपासले पाहिजे. अकृत्य वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात ते बंद झालं पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की सामान्य माणसांच्या अधिकार आहे तो द्या. छत्रपती घराण्यातील स्त्रीला अवमानकारक बोललं गेलं, वागणूक दिली गेली. आजच्या घडीला देखील हे का घडतंय? हे सरकारने पहायला पाहिजे.
संयोगीताराजे यांच्या बाबतीत काय प्रसंग घडला?
दरम्यान, संयोगीताराजे यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की,नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पुजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.
तसं काही घडलं नाही
दुसरीकडे, संयोगीताराजे या पावणेदोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात महामृत्युंजय, रामरक्षा म्हटली होती. त्यांना कोणीही रोखलं नाही, असं महंत सुधीरदास यांनी म्हटले आहे. तरीही त्यांना त्यावेळी काही अपमानास्पद वाटलं असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो असंही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या