Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
Samarjeetsinh Ghatge : समरजित यांनी कागलमधून तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी स्वतः शरद पवार यांच्याकडूनच प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी दोनवेळा संपर्क साधला होता.
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कागलमधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर कागलमध्ये भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे कोणता निर्णय घेणार? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. समरजित यांनी कागलमधून तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी स्वतः शरद पवार यांच्याकडूनच प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी दोनवेळा संपर्क साधला होता.
समरजित घाटगे यांनी काल भाजपला सोशल मीडियातून हटवल्यानंतर त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. दरम्यान, समरजित घाटगे एका बाजूला कार्यकर्त्यांचा मेळावा घेत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट कागलमध्ये आजच पोहोचणार आहेत. दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा सुद्धा झाली आहे. त्यामुळे आज दुपारी समरजित आणि जयंत पाटील यांची भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीमध्येच आज कागलच्या हायहोल्टेज लढतीवर शिक्कामोर्तब होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
दरम्यान, आज मेळाव्याला सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करताना तुतारीवर निवडणूक लढवण्याची घोषणाबाजी केली. साहेब तुतारी हाती घ्या अशीच मागणी कार्यकर्ते करत होते.
इतर महत्वाच्या बातम्या