एक्स्प्लोर

Kolhapur News : सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांना जाहीर 

स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख एक हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Kolhapur News :  डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera borwankar) यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख एक हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लेखक सुधीर भोंगळे यांना समाजकार्य पुरस्कार, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत (Rahi Sarnobat) यांना युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी याबाबत माहिती दिली आहे. दत्त साखर कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार दिवंगत डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनी पुरस्कार वितरण केले जाते. 

चालू वर्षापासून निवड समितीने परिवर्तनशील कार्यकर्त्यास स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून या वर्षीचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार कृषी क्षेत्रांतील लेखक व संशोधक सुधीर भोंगळे यांना दिला जाणार आहे. 51 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव लौकिक करणाऱ्या आदर्श राष्ट्रीय खेळाडू राही सरनोबत हिला स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्काराविषयी माहिती देतानवा विनोद शिरसाट म्हणाले की, दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुका आणि परिसरात शेतकरी सहकारी संस्थाच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली. व्यावसायिक नितीमूल्यांचा अंगीकार करीत, ध्येयवादी पद्धतीने काम करणाऱ्या सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी मीरा बोरवणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

पत्रकार परिषदेस दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, संचालक अनिलराव यादव, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, संजय पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Embed widget