Dhananjay Mahadik : लेकाच्या लग्नाची अन् मंडलिकांच्या प्रचाराची जबाबदारी; दोन्ही लगीनघाईवर महाडिक काय म्हणाले?
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच घरात पै पाहुण्यांची वर्दळ सुरु आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) दोन्ही जागांसाठी अत्यंत चुरशीने प्रचार सुरु आहे. शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या नेत्यांकडून चांगलाच जोर लावला जात आहे. खासदार धनंजय महाडिक यांना संजय मंडलिक यांच्या प्रचारासह लेकाच्या लगीनघाईची सुद्धा जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे दोन्ही लगीनघाईची जबादारी पार पाडण्याचे आव्हान धनंजय महाडिक यांच्यासमोर आहे. त्यामुळे आधी लग्न कोंढाण्याचे अशी स्थिती झाली आहे.
विश्वराज महाडिक यांच्या लग्नाची जोरदार तयारी
त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांच्या घरामध्ये आधी लग्न लोकसभेचे असे चित्र आहे. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच घरात पै पाहुण्यांची वर्दळ सुरु आहे. यासाठी मंडप सुद्धा सजला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात बिझी आहेत.
मुलाच्या लग्नकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेता येत नसल्याची खंत असली तरी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळे धडपडत असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. त्यांनी सांगितले की, घरातील लग्नाची सगळी तयारी पत्नी अरुंधती महाडिक करत आहेत. मी केवळ मुहूर्तावर जाऊन पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्यामुळे पत्नी अरुंधती महाडिक यांनी आपल्या मुलाचे लग्न असून मुहूर्ताची आठवण धनंजय महाडिक यांना करून दिली. त्यामुळे एकीकडे घरात लगीनघाई आणि दुसरीकडे प्रचाराची घाई दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या